चिचखेड शिवारात आगीत चार बिघे गहू भस्मसात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2019 16:27 IST2019-04-06T16:26:57+5:302019-04-06T16:27:10+5:30
चाळीस पोते काढणीला आलेला गहू आगीच्या भक्ष्यस्थानी

चिचखेड शिवारात आगीत चार बिघे गहू भस्मसात
पिंपळगाव बसवंत : येथुन जवळच असलेल्या चिंचखेड शिवारात शेतात आग लागून गहू पिकाचे मोठे नुकसान झाले.पिंपळगाव बसवंत अग्निशामक दलाने दिलेल्या माहितीनुसार, चिंचखेड शिवारात रविंद्र भास्कर संधान यांचे गट नंबर ८४१ मध्ये गव्हाचे शेतीला शुक्रवारी (दि.५) सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास आग लागली होती. यात चार बिघे गहू पूर्णपणे जळुन खाक झाला. जवळपास चाळीस पोते काढणीला आलेला गहू आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. या शेतालगत असलेल्या भाऊसाहेब पाटील यांच्या द्राक्षे बागेलाही झळ पोहोचली आणि बराचसा भाग होरपळला गेला. पिंपळगाव बसवंत अग्निशामक दलाने या आगीवर वेळीच नियंत्रण मिळवल्याने परीसरात पसरणारी आग आटोक्यात आणली गेली. या शेतातून जाणाऱ्या ११०० केव्हीच्या लाईनमध्ये हवेमुळे शॉर्ट सर्कीट झाल्याने आग लागल्याचे सांगण्यात आले.