शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

पानिपत चित्रपटात मराठ्यांचा इतिहास झाकल्याचा आरोप ; छावा क्रांतिवीर सेनेचा आंदोलनाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2019 19:59 IST

पानिपत चित्रपटात मराठ्यांचा इतिहास झाकण्याचा प्रयत्न होत असून, चित्रपटाच्या लेखकांना सदाशिवराव भाऊ या एका व्यक्तिरेखेभोवतीच मसाला लावून कथा रंगविली आहे. त्याचप्रमाणे चित्रपटाच्या ट्रेलरमध्येही मराठा सरदारांच्या भूमिका आणि नावे दिसून येत नाही. मराठा सरदारांचा इतिहास डावलून पानिपतचा इतिहास होऊच शकत नाही. त्यामुळे अशाप्रकारे मराठ्यांचा इतिहास झाकण्याचा प्रयत्न करून चित्रपट प्रदर्शित करण्याचा प्रयत्न केल्यास कोणत्याही चित्रपटगृहात पानिपत चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही, असा इशारा छावा क्रांतिवीर संघटनेने जिल्हाधिकाऱ्याना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.

ठळक मुद्देपानिपत चित्रपटाच्या ट्रेलरवर आक्षेप मराठ्यांचा इतिहास झाकल्याचा आरोप मराठा संघटनांचा चित्रपट प्रदर्शित होऊ न देण्याचा इशारा छावा क्रांतीवीर संघटनेकडून जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन

नाशिक :पानिपत चित्रपटात मराठ्यांचा इतिहास झाकण्याचा प्रयत्न होत असून, चित्रपटाच्या लेखकांना सदाशिवराव भाऊ या एका व्यक्तिरेखेभोवतीच मसाला लावून कथा रंगविली आहे. त्याचप्रमाणे चित्रपटाच्या ट्रेलरमध्येही मराठा सरदारांच्या भूमिका आणि नावे दिसून येत नाही. मराठा सरदारांचा इतिहास डावलून पानिपतचा इतिहास होऊच शकत नाही. त्यामुळे अशाप्रकारे मराठ्यांचा इतिहास झाकण्याचा प्रयत्न करून चित्रपट प्रदर्शित करण्याचा प्रयत्न केल्यास कोणत्याही चित्रपटगृहात पानिपत चित्रपट  प्रदर्शित होऊ देणार नाही, असा इशारा छावा क्रांतिवीर संघटनेने जिल्हाधिकाऱ्याना शुक्रवारी (दि.८) निवेदनाद्वारे दिला आहे.पानिपत चित्रपट केवळ सदाशिवराव भाऊ याच व्यक्तिरेखेभोवती फिरत असून, चित्रपटात दत्ताजी शिंदे व मराठा सरदारांचा इतिहास मात्र झाकण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप छावा क्रांतिवर सेनेने केला आहे. पानिपतच्या ट्रेरलमध्ये पेशवे आणि अब्दाली यांच्या व्यतिरिक्त कोणत्याही मराठा सरदाराचे नाव नाही, यामुळे मराठ्यांच्या मनात असंतोषाची लाट निर्माण झाली आहे. दत्ताजी शिंदे, महादजी शिंदे, मल्हारराव होळकर यांच्या शिवाय पानिपत बनतोच कसा, असा सवालही या निवेदनातून उपस्थित करण्यात आला आहे. पानिपतचा नायक कोणीही एक नसून दत्ताची शिंदे यांच्यासोबतच जनकोजी शिंदे, मल्हारराव होळकर, महादजी शिंदे , विश्वासराव पेशवा, इब्राहिम खान गारदी यांच्यासह ४८हून अधिक मातब्बर घराणी व  महाराष्ट्रातील संपूर्ण समाज आहे. परंतु चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये सदाशिव भाऊ यांच्यावरच प्रकाशझोत टाकण्यात येत असून, एकही लढवय्या मराठ्याचे नाव नसून विशिष्ट समूहाचे उदात्तीकरणासाठी अस्सल मराठ्यांचा इतिहास झाकण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप क्रांतिवर सेनेने जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केला आहे. यावेळी छावा क्रांतिवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांच्यासह प्रा.  उमेश शिंदे, शिवा तेलंग, शिवाजी मोरे, संतोष माळोदे ,नितीन सातपुते, गणेश दळवी, भगवान ताडगे, प्रदीप आहिराव आदी उपस्थित होते.  दरम्यान, तंजावर ते पेशावर असा दूरवर पसरलेल्या मराठा सम्राज्याचे शासक आणि मालक हे फक्त छत्रपतीच होते. परंतु यात पेशव्यांच्या तोंडी ‘आम्ही पूर्ण मराठा साम्राज्याचे शासक झालोत’ हा डायलॉग देऊन गोवारीकरांना काय साध्य करायचे आहे, असा सवाल करत इतिहासात छेडछाड करण्याचा त्यांचा हा केविलवाणा प्रयत्न हाणून पाडला जाईल, असा इशारा छावा क्रांतिवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांनी दिला आहे. 

टॅग्स :agitationआंदोलनNashikनाशिकPanipat Movieपानिपतchava organisationछावा संघटनाcollectorजिल्हाधिकारी