पानिपत चित्रपटात मराठ्यांचा इतिहास झाकल्याचा आरोप ; छावा क्रांतिवीर सेनेचा आंदोलनाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2019 07:03 PM2019-11-08T19:03:23+5:302019-11-08T19:59:28+5:30

पानिपत चित्रपटात मराठ्यांचा इतिहास झाकण्याचा प्रयत्न होत असून, चित्रपटाच्या लेखकांना सदाशिवराव भाऊ या एका व्यक्तिरेखेभोवतीच मसाला लावून कथा रंगविली आहे. त्याचप्रमाणे चित्रपटाच्या ट्रेलरमध्येही मराठा सरदारांच्या भूमिका आणि नावे दिसून येत नाही. मराठा सरदारांचा इतिहास डावलून पानिपतचा इतिहास होऊच शकत नाही. त्यामुळे अशाप्रकारे मराठ्यांचा इतिहास झाकण्याचा प्रयत्न करून चित्रपट प्रदर्शित करण्याचा प्रयत्न केल्यास कोणत्याही चित्रपटगृहात पानिपत चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही, असा इशारा छावा क्रांतिवीर संघटनेने जिल्हाधिकाऱ्याना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.

Chhavan Revolutionary Army agitation warning of Panipat movie covering history of Marathas | पानिपत चित्रपटात मराठ्यांचा इतिहास झाकल्याचा आरोप ; छावा क्रांतिवीर सेनेचा आंदोलनाचा इशारा

पानिपत चित्रपटात मराठ्यांचा इतिहास झाकल्याचा आरोप ; छावा क्रांतिवीर सेनेचा आंदोलनाचा इशारा

Next
ठळक मुद्देपानिपत चित्रपटाच्या ट्रेलरवर आक्षेप मराठ्यांचा इतिहास झाकल्याचा आरोप मराठा संघटनांचा चित्रपट प्रदर्शित होऊ न देण्याचा इशारा छावा क्रांतीवीर संघटनेकडून जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन

नाशिक :पानिपत चित्रपटात मराठ्यांचा इतिहास झाकण्याचा प्रयत्न होत असून, चित्रपटाच्या लेखकांना सदाशिवराव भाऊ या एका व्यक्तिरेखेभोवतीच मसाला लावून कथा रंगविली आहे. त्याचप्रमाणे चित्रपटाच्या ट्रेलरमध्येही मराठा सरदारांच्या भूमिका आणि नावे दिसून येत नाही. मराठा सरदारांचा इतिहास डावलून पानिपतचा इतिहास होऊच शकत नाही. त्यामुळे अशाप्रकारे मराठ्यांचा इतिहास झाकण्याचा प्रयत्न करून चित्रपट प्रदर्शित करण्याचा प्रयत्न केल्यास कोणत्याही चित्रपटगृहात पानिपत चित्रपट  प्रदर्शित होऊ देणार नाही, असा इशारा छावा क्रांतिवीर संघटनेने जिल्हाधिकाऱ्याना शुक्रवारी (दि.८) निवेदनाद्वारे दिला आहे.
पानिपत चित्रपट केवळ सदाशिवराव भाऊ याच व्यक्तिरेखेभोवती फिरत असून, चित्रपटात दत्ताजी शिंदे व मराठा सरदारांचा इतिहास मात्र झाकण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप छावा क्रांतिवर सेनेने केला आहे. पानिपतच्या ट्रेरलमध्ये पेशवे आणि अब्दाली यांच्या व्यतिरिक्त कोणत्याही मराठा सरदाराचे नाव नाही, यामुळे मराठ्यांच्या मनात असंतोषाची लाट निर्माण झाली आहे. दत्ताजी शिंदे, महादजी शिंदे, मल्हारराव होळकर यांच्या शिवाय पानिपत बनतोच कसा, असा सवालही या निवेदनातून उपस्थित करण्यात आला आहे. पानिपतचा नायक कोणीही एक नसून दत्ताची शिंदे यांच्यासोबतच जनकोजी शिंदे, मल्हारराव होळकर, महादजी शिंदे , विश्वासराव पेशवा, इब्राहिम खान गारदी यांच्यासह ४८हून अधिक मातब्बर घराणी व  महाराष्ट्रातील संपूर्ण समाज आहे. परंतु चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये सदाशिव भाऊ यांच्यावरच प्रकाशझोत टाकण्यात येत असून, एकही लढवय्या मराठ्याचे नाव नसून विशिष्ट समूहाचे उदात्तीकरणासाठी अस्सल मराठ्यांचा इतिहास झाकण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप क्रांतिवर सेनेने जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केला आहे. यावेळी छावा क्रांतिवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांच्यासह प्रा.  उमेश शिंदे, शिवा तेलंग, शिवाजी मोरे, संतोष माळोदे ,नितीन सातपुते, गणेश दळवी, भगवान ताडगे, प्रदीप आहिराव आदी उपस्थित होते.  दरम्यान, तंजावर ते पेशावर असा दूरवर पसरलेल्या मराठा सम्राज्याचे शासक आणि मालक हे फक्त छत्रपतीच होते. परंतु यात पेशव्यांच्या तोंडी ‘आम्ही पूर्ण मराठा साम्राज्याचे शासक झालोत’ हा डायलॉग देऊन गोवारीकरांना काय साध्य करायचे आहे, असा सवाल करत इतिहासात छेडछाड करण्याचा त्यांचा हा केविलवाणा प्रयत्न हाणून पाडला जाईल, असा इशारा छावा क्रांतिवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांनी दिला आहे. 

Web Title: Chhavan Revolutionary Army agitation warning of Panipat movie covering history of Marathas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.