शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

सप्तशृंगगडावरील चैत्रोत्सवाची सांगता : कीर्तिध्वज फडकला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2018 00:42 IST

साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धेपीठ असलेल्या सप्तशृंगगडावर शुक्रवारी रात्री कीर्तिध्वज फडकवत चैत्रोत्सवाची सांगता झाली. कीर्तिध्वजाचे मानकरी एकनाथ गवळी-पाटील यांनी गडाच्या शिखरावर ध्वज लावला. शेकडो मैल पायी प्रवास करत तळपत्या उन्हात केवळ भगवतीच्या दर्शनाची ओढ घेऊन सप्तशृंगगडावर दाखल होत तब्बल १६ लाख भाविक भगवतीचरणी लीन झाले.

कळवण : साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धेपीठ असलेल्या सप्तशृंगगडावर शुक्रवारी रात्री कीर्तिध्वज फडकवत चैत्रोत्सवाची सांगता झाली. कीर्तिध्वजाचे मानकरी एकनाथ गवळी-पाटील यांनी गडाच्या शिखरावर ध्वज लावला. शेकडो मैल पायी प्रवास करत तळपत्या उन्हात केवळ भगवतीच्या दर्शनाची ओढ घेऊन सप्तशृंगगडावर दाखल होत तब्बल १६ लाख भाविक भगवतीचरणी लीन झाले. श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टच्या मुख्य कार्यालयात पारंपरिक पद्धतीने मानकरी पुजारी व कीर्तिध्वजाची विधिवत पूजा मुख्य जिल्हा सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे, जिल्हा न्यायाधीश तथा सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टच्या अध्यक्ष श्रीमती यू.एन. नंदेश्वर, विश्वस्त डॉ. रावसाहेब शिंदे, राजेंद्र सूर्यवंशी, व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे, ध्वजाचे मानकरी दरेगावचे गवळी कुटुंबीय, पोलीसपाटील शशिकांत बेनके-पाटील, शिवसेनेचे गिरीश गवळी, सरपंच राजेश गवळी, माजी सरपंच संदीप बेनके-पाटील, पोलीस निरीक्षक सुजय घाटगे, पोलीस उपनिरीक्षक विनोद जाधोर आदींसह नागरिक उपस्थित होते.  मान्यवर कुटुंबीयांच्या हस्ते कीर्तिध्वजाची विधिवत पूजाअर्चा होऊन देवस्थानच्या मुख्य कार्यालयापासून शिरपूरच्या गोल्डन बॅण्डच्या गजरात पहिल्या पायरीपर्यंत मिरवणूक काढण्यात आली. कीर्तिध्वजाचे मानकरी एकनाथ गवळी पाटील व सहकाऱ्यांकडे कीर्तिध्वज सुपूर्द करण्यात आला. ‘सप्तशृंगीमाता की जय, परशुराम बाला की जय, मार्कंडेय महाराज की जय’ असा जयघोषाने गड परिसरदुमदुमून गेला होता.  कीर्तिध्वज मिरवणुकीदरम्यान लाखोंच्या संख्येने भाविकांनी गर्दी केल्याने पोलीस निरीक्षक सुजय घाटगे, जनसंपर्क अधिकारी भिकन वाबळे, माजी सरपंच संदीप बेनके पाटील, सरपंच राजेश गवळी, मयूर बेनके, गणेश बर्डे यांनी गर्दीवर नियंत्रण ठेवले. मध्यरात्री १२ वाजता सप्तशृंगीच्या शिखरावर भगव्या रंगाचा कीर्तिध्वज फडकविण्यात आला. शनिवारी पहाटेपासून देवीभक्तांनी कीर्तीध्वजाचे दर्शन घेतले. राज्याच्या विविध भागातून आलेल्या भाविकांमुळे गड परिसर गजबजून गेला होता. अनेक भाविक घरी परतले असून काही परतण्याच्या मार्गावर आहेत.  समुद्रसपाटीपासून ४६०० फूट उंची असलेल्या सप्तशृंग-गडावरील दरेगावचे पाटील गवळी-पाटील कुटुंबीय सप्तशृंगीच्या शिखरावर चढतात. चढण्यासाठी कुठलाही मार्ग नाही. झाडेझुडपे नाही, खाचखळगे नाहीत मग पाटील शिखरावरती जातात तरी कसे, असा प्रश्न भाविकांमध्ये चर्चेचा असतो. हा चमत्कारिक अनुभव अनुभवण्यासाठी हजारो भाविक गडावर उपस्थित राहातात. कीर्तिध्वज फडकविण्याची परंपरा गवळी कुटुंबाची असून, रात्री ते शिखरावरती जाऊन ध्वजारोहण करतात. दुसºया दिवशी सकाळी कीर्तिध्वज फडकताना दिसतो.  नवरात्रोत्सवात विजयादशमीच्या आदल्या दिवशी म्हणजेच नवमीच्या मध्यरात्री व चैत्र पौर्णिमेच्या आदल्या दिवशी (चावदस) च्या मध्यरात्री निशाण लावतात. कीर्तिध्वजासाठी  ११ मीटर उंच व लांब कापड साधारणपणे त्याच मापाची काठीही लागते.  ३ शिखरावर जाताना मार्गातील अनुषंगिक देवतांची पूजा करण्यासाठी ३० ते ३५ किलो वजनाचे पूजा साहित्य, धान्य इत्यादी वस्तू घेऊन जातात. दुपारी ४ वा. सुमारास संपूर्ण गावातून कीर्तिध्वजाची मिरवणूक निघून लाखो भक्तांच्या साक्षीने हा सोहळा पार पडतो.  सायंकाळी ७.३० वा. देवी भगवतीच्या मंदिरात पोहोचून गवळी पाटील कुटुंबीय आई भगवतीसमोर नतमस्तक होऊन शिखरावरती चढून जुना ध्वज काढून त्याजागी नवा ध्वज फडकवून त्याची विधिवत पूजा करण्याची परंपरा कायम आहे. शिखरावर ध्वज फडकविल्यानंतर झेंड्याचे दर्शन घेऊन खान्देशातील देवीभक्त परतीच्या मार्गाला लागतात.

टॅग्स :saptashrungi templeसप्तश्रृंगी देवी मंदिर