शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
2
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
3
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
5
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
6
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
7
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
8
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
9
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
10
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
11
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
12
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
13
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
14
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
15
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
16
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
17
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
18
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
19
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
20
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र

नाशकात घुमला छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार, शिवजन्मोत्सवाचा विश्वविक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 5:53 PM

'तुमचं आमचं नातं काय, जय जिजाऊ जय शिवराय' या गगणभेदी गजर्नेसह शिवभक्तांनी छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराजाच्या जयघोषाने सोमवारी (दि.19) अवघी नाशिकनगरी दणाणून सोडली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त कान्हेरे मैदानापासून ते पंचवटी कारंजार्पयत काढण्यात आलेल्या पालखी मिरवणुकीत छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार करण्यात आला.

ठळक मुद्देनाशकातून शिवजन्मोत्सव पालखीची मिरवणूकशहरात छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष शिवभक्तांनी धरला पारंपारिक वाद्यावर ठेका

नाशिक : 'तुमचं आमचं नातं काय, जय जिजाऊ जय शिवराय' या गगणभेदी गजर्नेसह शिवभक्तांनी छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराजाच्या जयघोषाने सोमवारी (दि.19) अवघी नाशिकनगरी दणाणून सोडली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त कान्हेरे मैदानापासून ते पंचवटी कारंजार्पयत काढण्यात आलेल्या पालखी मिरवणुकीत छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार करण्यात आला. यावेळी पालखी सोहळ्य़ात सहभागी पारंपारिक वाद्यांच्या तालावर विविध लोककलांच्या सादरीकरणासोबत लेझिम पथक आणि मिरवणुकीत शिवभक्तांनीही ठेका धरला.छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सव सोहळ्य़ानिमित्त हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर सकाळी शिववंदना व जिजाऊ वंदना करण्यात आली. यावेळी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांच्या हस्ते आयोजकांना एक लाख नागरिकांच्या सहभागासह जिवजन्मोत्सव साजरा करण्यासाठी जिनियस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड आणि वंडर बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदी प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी शिवजन्मोत्सव सोहळा समितीचे ग्रामीण अध्यक्ष आमदार अपुर्व हिरे, शिवजन्मोत्सव सोहळा समितीचे शहर अध्यक्ष सुनील बागुल, आमदार सीमा हिरे, छावा क्रांतीवीर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर आदिंसह विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. त्यानंतर गगणभेगी तुताऱ्यांच्या निनादांसह ढोल ताशाच्या गजरात मिरवणुकीला सुरुवात झाली.

मिरवणुकीत छत्रपती शिवाजी महाराजांचा संत तुकाराम महाराज यांच्यासोबतचा संवाद दाखवणारा चित्ररथ, त्यानंत राजमाता जिजाऊ बाल शिवाजींना स्वराडज्य स्थापनेचे धडे देतानाचे दर्शन घडविणाऱ्यां चित्ररथासोबतच संभाजी महाराजांची शौर्यगाथा सांगणाऱ्या चित्ररथांचाही मिरवणुकीत समावेश करण्यात आला होता. शहरातील विविध शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मिरवणुकीत सहभागी होत ढोल ताशाच्या तालावर लेझीमनृत्य सादर केले. छत्रपती शिवाजी महाराजांची व छत्रपती संभाजी महाराजांची वेशभूषा करून काही घोडेस्वारांनीही मिरवणुकीत सहभागी होत शिवभक्तांचे लक्ष वेधून घेतले. अशोक स्तंभावरून पुढे रविवार कारंजावर पोहचल्यानंतर मिरवणुकीत पोहचल्यानंतर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुर्णाकृती पुतळ्य़ास अभिवादन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांना पंचामृताने अभिषेक करण्यात आल्यानंतर पालखी सोहळ्य़ाची सांगता झाली. पंचवटी कारंजा येथील सोहळ्य़ाचे सूत्रसंचालन तूषार जगताप यांनी केले.

पालकमंंत्र्यांनीही धरला ठेका छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सव पालखी सोहळ्याचे दर्शन घेण्यासाठी नाशिकचे पालकमत्री गिरीश महाजन यांनीही हजेरी लावली. यावेळी उपस्थित शिवभक्तांनी त्यांना मिरवणुकीत सहभागी होण्याचे आवाहन केल्यामुळे त्यांनीही ढोल ताशाच्या तालावर ठेका धरीत लेझीम खेळण्याचा आनंद घेतला 

सीबीएस, मालेगाव स्टँण्ड येथे मानवंदनाशिवजन्मोत्सव सोहळ्य़ात सहभागी शिवभक्तांनी सीबीएस तसेच मालेगाव स्टॅँडवरील अश्वारुढ पुतळ्य़ाला मानवंदना दिली. येथे पालखी सोहळ्य़ातील आदिवाशी कला पथकांनी विविध कलाविष्कार सादर केले.यावेळी महिलांनीही मोठ्या प्रमाणात पालखी सोहळ्यात सहभाग घेतला.

 

छत्रपती बहूजनांचे कैवारीबहूजनांच्या रक्षणासाठी शहाजी राजे व राजमाता जिजाऊ यांच्या मार्गदर्शनात छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली असून छत्रपती संभाजी महाराजांनीही हाच वसा कायम राखला. त्यामुळेच छत्रपती अवघ्या बहूजनांचे कैवारी असल्याचे शिवजन्मोत्सवाच्या प्रारंभी बोलताना सई वाकचौरे, हर्षदा बनकर, मयुरी पिंगळे, वैष्णवी ठाकरे, मुग्धा थोरात या पंचकन्यांनी सांगितले. तर गायत्री पनमहाले हिने छत्रपती शिवीजी महाराजांवरील पोवाडा सादर केला.

टॅग्स :Shivaji Jayanti 2018शिवजयंती २०१८Nashikनाशिक