शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
2
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
3
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
4
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा
5
२५% ने बधला नाही, ट्रम्प भारताच्या वर्मावर घाव घालण्याच्या तयारीत; 'या' सेक्टरवर २५०% टॅरिफची धमकी
6
अभिमानास्पद! वडिलांची मित्रांनी उडवली खिल्ली, आईने केला सपोर्ट; लेक गाजवते फुटबॉलचं मैदान
7
"महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका VVPAT मशिनवरच घ्यावात’’, काँग्रेसची मागणी
8
मतदार यादीतून वगळलेले ६५ लाख कोण? तीन दिवसांत सादर करा; सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला आदेश
9
महेश मांजरेकरांच्या 'वेडात मराठे वीर दौडले सात' सिनेमाचं काय झालं? मुख्य अभिनेता म्हणाला...
10
मच्छर घुसला की काम तमाम...! घरासाठी लेझर गायडेड एअर डिफेन्स सिस्टीम आली; दिसताच आडवा करणार...
11
लाडक्या बहिणींच्या पैशांवर डल्ला मारणाऱ्यांचं आता काही खरं नाही, पुढील १५ दिवसांत...
12
१ पद, २ विभाग अन् २ आदेश; CM देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या खात्यांमध्ये नियुक्तीवरून संघर्ष?
13
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेले मुख्यालय पुन्हा बांधण्यासाठी जैशचा प्रमुख पुन्हा सक्रिय; मसूद अझहरने अनेकांकडे देणग्या मागितल्या
14
नवजात लेकीला कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकलं पण 'त्याने' जीवदान दिलं, शरीराला लागलेले किडे
15
RBI च्या निर्णयानंतर गुंतवणूकदारांना झटका! विप्रोसह 'या' क्षेत्रात मोठी घसरण, कुठे झाली वाढ?
16
“जनभावनेचा आदर करणारे हे सरकार, आम्ही...”; ‘महादेवी’ परतण्याबाबत एकनाथ शिंदेचे मोठे विधान
17
लग्नाचं निमंत्रण दिलं नाही, सहकाऱ्यांनी एचआरकडे केली तरुणीची तक्रार, त्यानंतर घडलं असं काही...
18
"कित्येकांनी बलिदान दिले, शिरांचे ढीग लागले, पण धर्म सोडला नाही"- मोहन भागवत
19
"डोकं फिरवू नका, मी मंत्री, तुम्ही मलाच न सांगता...", PWD अधिकाऱ्यावर संतापले दयाशंकर सिंह
20
जगाला आपल्या धाकात ठेऊ पाहणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची संपत्ती किती? उत्पन्नाचा खरा स्रोत कोणता?

मनुवादी प्रवृत्तींविरुद्ध बोलतच राहणार : छगन भुजबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 01:38 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज व महात्मा फुले यांच्या विचारांवर चालणारा आमचा लढा असून, कितीही धमक्या आल्या तरी समाजाचे चक्र उलटे फिरविणाऱ्या प्रवृत्तींच्या विरुद्ध बोलतच राहणार, असे सडेतोड प्रत्युत्तर आमदार छगन भुजबळ यांनी दिले. आॅल इंडिया सैनी(माळी) समाजाच्या राष्ट्रीय अधिवेशनात ते बोलत होते.

नाशिक : डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज व महात्मा फुले यांच्या विचारांवर चालणारा आमचा लढा असून, कितीही धमक्या आल्या तरी समाजाचे चक्र उलटे फिरविणाऱ्या प्रवृत्तींच्या विरुद्ध बोलतच राहणार, असे सडेतोड प्रत्युत्तर आमदार छगन भुजबळ यांनी दिले. आॅल इंडिया सैनी(माळी) समाजाच्या राष्ट्रीय अधिवेशनात ते बोलत होते.  जय शंकर लॉन्स येथे रविवारी (दि.२८) आयोजित अधिवेशनात भुजबळ यांनी धमकी पत्राविषयी विरोधकांना थेट आव्हान दिले. यावेळी भुजबळ म्हणाले, महात्मा फुले यांच्या विचारांवर आधारित संविधानाची रचना करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वांना समान अधिकार बहाल केले. देशातील वंचित घटकांना पुढे आणण्यासाठी आरक्षण दिले. परंतु सध्याच्या काळात दिल्लीत संविधान जाळणाºया व्यक्तींवर कारवाई न करताच सोडून देण्यात येते, याउलट मनुस्मृती जाळणाºया लोकांवर गुन्हे दाखल केले जातात आमचा लढा हा समतेला विरोध करणाºया प्रवृत्तींच्या विरोधात आहे. असे भुजबळ म्हणाले.मनुस्मृती ग्रंथ तसेच संभाजी भिडे यांच्याविरोधात बोलले तर पानसरे, दाभोलकर यांच्याप्रमाणे हत्या करण्यात येईल, असे धमकीचे पत्र पाठविण्यात आले असले तरी अशाप्रकारचे अनेक पत्र प्राप्त झाले आहे. अशा धमक्यांना न घाबरता यापुढेही आम्ही मनुस्मृतीचे दहन करणारच,असा पुनरूच्चार केला.महात्मा फुले, डॉ. आंबेडकर यांच्या विचाराला विरोध करणाºयाविरोधात आम्ही कधीही शांत बसणार नाही. अनेकदा आमचे तोंड बंद करण्याचे प्रयत्न करण्यात आले. अडीच वर्षे तुरुंगात ठेवले. मात्र याला आमचा कायम विरोध असणार असल्याचे यावेळी भुजबळ यांनी स्पष्ट केले. दरम्यान, या अधिवेषनात देशभरातून आलेल्या माळी समाजाच्या कार्यकर्त्यांनी आपल्या भाषणात भुजबळ यांना आलेल्या धमकीचा निषेध नोंदविला.अधिवेशनातील ठरावमहात्मा फुले यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावाज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस ३ जानेवारी महिला शिक्षण दिन म्हणून साजरा करण्यात यावा हे दोन महत्त्वाचे ठराव एक मताने मंजूर करण्यात आले.राष्ट्रवादीकडून मनुस्मृती जाळण्याचा प्रयत्ननाशिक : राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना आलेल्या धमकी पत्राचे पडसाद शहरात उमटले. पंचवटी कारंजा येथे राष्टÑवादी कॉँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मनुस्मृतीचे दहन करण्याचा प्रयत्न केला. यावेळी तत्काळ पोलीस घटनास्थळी पोहचले.  राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा राष्टÑवादी कॉँग्रेस पक्षाचे नेते छगन भुजबळ यांना धमकीचे पत्र पोहचल्याने राष्टÑवादी कॉँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास राष्टÑवादीच्या काही कार्यकर्त्यांनी पंचवटी कारंजावर एकत्र येत मनुस्मृती जाळण्याचा प्रयत्न केला. कार्यकर्त्यांनी शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे व मनुस्मुतीच्या विरोधात घोषणा दिल्या. यामुळे काही वेळ तणावाची परिस्थीती निर्माण झाल्याने पोलिसांची धावपळ झाली. मनु फुले, शाहू, शिवराय, आंबेडकरांच्या विचारांनी प्रेरित झालेल्या महाराष्टÑात समतेच्या विचाराला कोणीही दाबू शकणार नाही, असेही निवेदनात म्हटले आहे.

टॅग्स :Chagan Bhujbalछगन भुजबळNCPराष्ट्रवादी काँग्रेसNashikनाशिक