शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
3
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
4
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
5
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
6
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
7
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
8
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
9
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
10
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
11
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
12
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
13
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
14
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
15
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
16
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
17
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर
18
'निराधार आणि बेजबाबदार'; राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने सोडले मौन, काय दिले उत्तर?
19
IND vs ENG 5th Test: Gus Atkinson चा 'पंजा'! टीम इंडियानं २० धावांत गमावल्या ४ विकेट्स! अन्...
20
सेबीच्या नियमांना फाटा देऊन शेअर्सची खरेदी-विक्री, पण धोकाही मोठा! 'ग्रे मार्केट'ची Inside Story

नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा छगन भुजबळांनी हट्ट सोडला; म्हणाले, 'पद हवेच असे नाही' 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 14:55 IST

Maharashtra Politics: राज्यातील दोन जिल्ह्यांना अद्याप पालकमंत्री मिळालेले नाहीत. या दोन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदावरून महायुतीत सुप्त संघर्ष सुरू आहे. त्यात भुजबळांनी रस नसल्याचे सांगत माघार घेतलीये. 

Chhagan Bhujbal Maharashtra News: रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा विषय सातत्याने चर्चेत आहे. नाशिकमध्ये कुंभमेळा होणार आहे, त्यामुळे पालकमंत्र्यांची नियुक्ती आणि महायुतीत कोणाकडे पालकमंत्रिपद जाणार, याबद्दल राजकीय वर्तुळात उत्सुकताही आहे. छगन भुजबळ मंत्री झाल्याने वरिष्ठ मंत्री म्हणून त्यांच्याकडे पालकमंत्री पद जाईल, अशा चर्चा सुरू झाल्या. पण, भुजबळांनीच आता रस नसल्याचे म्हटले आहे. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

नाशिक दौऱ्यावर आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. नाशिक शहरातील वाहतूक व्यवस्थेची पाहणी करत असताना छगन भुजबळ यांनी पालकमंत्रिपदाबद्दल भाष्य केले. 

'सिंहस्थापूर्वी कामे मार्गी लागणे महत्त्वाचे आहे, त्यासाठी पालकमंत्रिपदच हवे असे नाही. आणि पालकमंत्रिपदासाठी आपला हट्टही नाही', असे वक्तव्य अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केले. 

वाचा >>सांगलीत काँग्रेसला मोठा धक्का; जयश्रीताईंना पालकमंत्री भेटले, भाजप प्रवेशाचे ठरले

मंत्री भरत गोगावले यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील निर्णयप्रक्रियेविरोधात केलेल्या वक्तव्याबाबत बोलताना भुजबळ म्हणाले, 'आमच्या काळात सर्व निर्णय बाळासाहेब ठाकरे हेच घ्यायचे आता कोण घेते ते माहीत नाही.

'मी सेनेतून बाहेर पडल्यानंतर पुन्हा तिथे जाण्याचा प्रश्न नव्हता. त्यामुळे माझा प्रवेश कोणामुळे थांबला, या वक्तव्याला महत्त्व नाही', असेही भुजबळ यावेळी म्हणाले. 

पालकमंत्री नियुक्तीबद्दल सस्पेन्स कायम?

मंत्रिपद मिळाल्यानंतर पालकमंत्रिपदाची जबाबदारी सोपविली जाईल, असा अंदाज बांधला जात होता. मात्र दरम्यानच्या काळात कुंभमेळ्याच्या बैठकीच्या निमित्ताने नाशिकमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालकमंत्री नसला तरी कुंभमेळा मंत्री आहे, ते कमी पडले तर आम्ही आहोतच असे सांगून एकप्रकारे पालकमंत्री नेमला जाणार नसल्याचे संकेत दिले होते. 

 

टॅग्स :Chhagan Bhujbalछगन भुजबळNashikनाशिकNCPराष्ट्रवादी काँग्रेसMahayutiमहायुती