ऊसपुरवठा करणाऱ्या शेतकºयांना धनादेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2018 00:56 IST2018-11-14T00:55:50+5:302018-11-14T00:56:06+5:30
डीव्हीपी धाराशीव साखर कारखाना लि. संचलित वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्यास चालू गळीत हंगामात ऊसपुरवठा करणाºया पहिल्या पाच शेतकºयांना काट्यावर धनादेश वाटप करण्यात आले.

ऊसपुरवठा करणाऱ्या शेतकºयांना धनादेश
लोहोणेर : डीव्हीपी धाराशीव साखर कारखाना लि. संचलित वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्यास चालू गळीत हंगामात ऊसपुरवठा करणाºया पहिल्या पाच शेतकºयांना काट्यावर धनादेश वाटप करण्यात आले. वसाका भाडेतत्त्वावर चालविण्यास देण्यात आला असून, धाराशीव साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी चालू गळीत हंगामासाठी ऊसपुरवठा करणाºया शेतकºयांना काट्यावरच पेमेंट देऊ असे जाहीर केले होते. याबाबत शेतकºयांमध्ये साशंकता व्यक्त केली जात होती; मात्र १२ नोव्हेंबर रोजी वसाकास ऊसपुरवठा करणाºया शेतकºयांना सायंकाळी काट्यावरच धनादेश मिळाले. संगीता कोटकर करजगाव , बाबुलाल पाटील मांदुरणे, परशराम पगार करंजगाव, जिभाऊ गुंजाळ नाकोडे, लीलाबाई शिंदे मांदुरणे या शेतकºयांना प्रतिटन २००० रुपये याप्रमाणे आलेल्या उसाच्या बिलाचे धनादेश वाटप करण्यात आले.