शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
2
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
3
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
4
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
5
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
6
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
7
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
8
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
9
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
10
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
11
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
12
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
13
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
14
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
15
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
16
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
17
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
18
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
19
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
20
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात

ऑनलाईन खरेदी विक्री संकेतस्थाळावरून नाशिकच्या ग्राहकाची फसवणूक ; मोबाईल दाखवून विकला अंघोळीचा साबन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 16:38 IST

आडगाव शिवारातील कोनार्कनगर परिसरातील एका तरुणाची ओएलएक्स या आॅनलाइन खरेदी-विक्रीचे व्यवहार करणाऱ्या कंपनीच्या संकेतस्थळावरून एका अज्ञात व्यक्तीने फसवणूक केल्याचा प्रकार गेल्या आठवड्यात घडला आहे. 

ठळक मुद्दे तरुणाची ऑनलान खरेदी-विक्री संकेतस्थळावरून फसवणूक नाशिकच्या तरुणाला मोबाईल दाखवून विकला अंघोळीचा साबन

नाशिक : आडगाव शिवारातील कोनार्कनगर परिसरातील एका तरुणाची ओएलएक्स या आॅनलाइन खरेदी-विक्रीचे व्यवहार करणाऱ्या कंपनीच्या संकेतस्थळावरून एका अज्ञात व्यक्तीने फसवणूक केल्याचा प्रकार गेल्या आठवड्यात घडला आहे. आडगावच्या कोनार्कनगर येथील हितेश विसपुते याने ओएलएक्स संकेतस्थळाच्या माध्यमातून जुना आयफोन खरेदी केला होता. त्यासाठी त्याने सुमारे दहा हजार रुपयांची रक्कम मोजली. मोबाइलचे पार्सल त्याला मिळाल्यानंतर त्याने कुरिअर कंपनीच्या प्रतिनिधीकडून पार्सल सोडवूनही घेतले. मात्र त्यात आयफोनऐवजी आंघोळीचा साबण व हेडफोन मिळाल्याने हितेश याला धक्काच बसला. त्याची फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्याने आडगाव पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली असून, या प्रकरणी अज्ञात संशयिताविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ओएलएक्सवर बुक केलेला सेकंड हॅण्ड अ‍ॅपल आयफोन सोडवून घेतला असता त्यात त्याला आयफोनऐवजी आंघोळीचा डव्ह साबण व हेडफोन मिळाल्याची घटना आडगाव शिवारातील कोणार्कनगर भागात घडली आहे. या प्रकरणी अज्ञात संशयिताविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोणार्कनगर येथी सार्वजनिक वाचनालयाजवळ असलेल्या बालाजी चौकात हितेश शंकर विसपुते हा राहतो. त्याने दि. 18 ते 21 फेब्रुवारीदरम्यान घरी असताना ओएलएक्सवर दहा हजार रुपयांचा सेकंडहॅण्ड अ‍ॅपल आयफोन मोबाईल बुक केला होता. त्या बदल्यात त्याने 9899588672 या क्रमांकाच्या संशयित मोबाईलधारकाला दहा हजार रुपये दिले व मोबाईलची मागणी केली. दरम्यान, या संशयिताने मोबाईल कुरिअरमार्फत पाठवितो, असे सांगितले; मात्र हे कुरिअर पाठविताना त्याने फोनच्या बॉक्समध्ये डव्ह साबण व हेडफोन पाठवून देत फसवणूक केली. याबाबत आडगाव पोलीस ठाण्याचे एपीआय बिडगर पुढील तपास करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNashikनाशिकPoliceपोलिसonlineऑनलाइन