लासलगावमध्ये ठेवीदारांची 80 लाखांची फसवणूक, करोडोंचा घोटाळा असण्याची शक्यता 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2018 08:03 IST2018-03-01T08:03:15+5:302018-03-01T08:03:15+5:30

सीट्रस चेक इन्स व रॉयल ट्विन्कल स्टार या कंपनीचे चेअरमन ओमप्रकाश गोयंका व त्यांचे इतर सहकारी यांच्याविरुद्ध ठेवीदारांची सुमारे 80 लाख रुपयांची फसवणूक व अपहारप्रकरणी बुधवारी रात्री  गुन्हा दाखल झाला आहे

Cheating case in Lasalgaon | लासलगावमध्ये ठेवीदारांची 80 लाखांची फसवणूक, करोडोंचा घोटाळा असण्याची शक्यता 

लासलगावमध्ये ठेवीदारांची 80 लाखांची फसवणूक, करोडोंचा घोटाळा असण्याची शक्यता 

लासलगाव (नाशिक) - लासलगाव  परिसरातील सुशिक्षित एजंटांना मोठे कमिशन देऊन काही वर्षात गुंतवणूक  केलेल्या रकमेवर घसघशीत परतावा मिळेल असे स्वप्नरंजन दाखविणा-या सीट्रस चेक इन्स व रॉयल ट्विन्कल स्टार या कंपनीचे चेअरमन ओमप्रकाश गोयंका व त्यांचे इतर सहकारी यांच्याविरुद्ध ठेवीदारांची सुमारे 80 लाख रुपयांची फसवणूक व अपहारप्रकरणी बुधवारी रात्री  गुन्हा दाखल झाला आहे.
या आर्थिक फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांची वाढती संख्या पाहता या गुन्ह्याची व्याप्ती वाढुन करोडो रूपयांचे फसवणुकीचा मोठी रक्कम वाढुन मोठा घोटाळा उघडकीस येईल असे लासलगावचे सहायक पोलिस निरीक्षक जनार्दन सोनवणे यांनी सांगितले.  
सुरुवातीला तीन चार वर्षांपूर्वी ट्विक॔ल या नावाने लासलगावसह नाशिक जिल्ह्यात  शिक्षक व लालची गुंतवणूकदार तसेच राष्ट्रीयीकृत बँकेत ठेव ठेवणारे ठेवीदार ,तसेच महिला व जेष्ठ  नागरिक  यांना तुमची रक्कम किती प्रचंड वाढेल या प्रकारचा भुलभुलैय्या परिसरातील प्रचंड कमिशन घेऊन महागड्या गाड्या खरेदी करून भुलविणारे एजंट यांनी  स्वताचे  कमीशनकरीता या गुंतवणूकदारांना आर्थिक  संकटात आणले. या एजंटाना  तातडीने पोलिसांनी अटक करून  त्यांची वाहने व संपत्ती जप्त करावी अशी मागणी त्रस्त गुंतवणूकदारांनी केली आहे.
गेली काही  दिवस या फसवणूक प्रकरणी तक्रारी येत होत्या. इमु घोटाळा , केबीसी नंतर ढोकेश्वर प्रकरणी  परिसरातल्या गुंतवणूक करणा-या लोकांची मोठ्या रक्कम  मिळेल अशी आमिष दाखविता या गुन्हा दाखल झाल्यानंतर मोठी फसवणूक होऊन लालची गुंतवणूक करणारे अडचणीत आले आहेत.
 

Web Title: Cheating case in Lasalgaon