शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
2
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
3
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
4
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
5
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
6
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
7
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
8
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
9
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
10
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
11
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
12
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
13
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
14
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
15
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
16
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
17
"मी थकलेय, सकाळी नाश्ता मिळणार नाही"; नैराश्यातून आईने लेकीची केली हत्या, स्वतःलाही संपवले
18
देशात पेट्रोल १८, तर डिझेल ३५ रुपयांनी महाग होणार? तेल कंपन्यांना दररोज १,६०० कोटींचा फटका; निवडणुकीनंतर दरवाढीचे दणके
19
लहानग्यांसाठी 'या' देशात येतंय 'चाइल्ड सिम कार्ड'; इंटरनेटवर देणार सुरक्षा, भारतातही का गरजेचे?
20
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
Daily Top 2Weekly Top 5

चव्हाण यांनी घेतली रेल्वेमंत्र्यांची भेट

By admin | Updated: July 30, 2016 01:22 IST

प्रवासी गाड्या : मनमाड, नांदगाव, निफाड, लासलगाव येथील समस्यांबाबत चर्चा

मनमाड : दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांची भेट घेऊन मनमाड, नांदगाव, निफाड, लासलगाव या भागातील रेल्वे संदर्भातील विविध समस्यांवर चर्चा केली. नांदगाव, न्यायडोंगरी, लासलगाव, निफाड आदि रेल्वे स्थानकांवर प्रवासी रेल्वे गाड्यांच्या थांब्यासंदर्भात सविस्तर चर्चा करून निवेदन दिले. या मतदारसंघातील न्यायडोंगरी स्टेशनजवळच श्रीक्षेत्र नस्तनपूर हे शनिदेवांचे मोठे देवस्थान असून, या ठिकाणी भाविकांच्या मागणी नुसार पुणे भुसावळ हुतात्मा एक्सप्रेस या गाड्यांना थांबा मिळावा त्याच बरोबर नांदगाव व निफाड रेल्वे स्थानकावर स्थानिक प्रवासी संघटना व नागरिकांच्या मागणी नुसार पुणे भुसावळ हुतात्मा एक्सप्रेस (११०२५/११०२६) तसेच लासलगाव रेल्वे स्थानकावर परिसरातील नागरिकांच्या मागणीनुसार कामयानी एक्सप्रेस (११०७१/११०७२) आणि नागपूर मुंबई नंदीग्राम एक्सप्रेस या प्रवासी गाड्यांना थांबा कसा आवश्यक आहे याचे महत्व खासदार चव्हाण यांनी विशद केले. या बैठकीत खासदार चव्हाण यांच्या समवेत रतन चावला हे उपस्थित होते. या बैठकीत मनमाड, नाशिक, नांदगाव, निफाड, लासलगाव या भागातील विविध रेल्वे संदर्भातील समस्यांवर चर्चा करण्यात आली. वरील सर्व रेल्वे गाड्यांना थांबा मिळण्यासाठी या पूर्वी रेल्वे मंत्र्यांना दिलेल्या निवेदनाचे स्मरण करून देण्यात आले. या भागातील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, कामगार, शेतकरी, व्यापारी , नोकरदार, व सर्वसामान्य प्रवासी या गाडयांना थांबा मिळाल्यास कशा पद्धतीने फायदा होऊ शकतो रेल्वे च्या आर्थिक उत्पनातं देखील वाढ होऊ शकते त्याच बरोबर ग्रामीण भागातील जनतेची जोडणी नाशिक महानगराकडे झाल्याने या भागाचा झपाट्याने विकास होण्यास मदत होईल असे खासदार चव्हाण यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे. दिंडोरी मतदार संघातील प्रवाश्याना वरील थांबा मिल्यालास विदर्भ, मराठवाडा व उत्तर भारतात तसेच मुंबईकडे जाण्यासाठी मोठी सोय होणार आहे. (वार्ताहर)