आज देशभर होणार १३ करोड रामनामाचा जप !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2019 23:45 IST2019-04-05T23:44:57+5:302019-04-05T23:45:08+5:30
पिंपळगाव बसवंत : प्रभुरामचंद्रांच्या अयोध्या या जन्मभूमीत मंदिर निर्माण व्हावे यासाठी ‘श्री राम जय जय राम’ या विजयी महामंत्राचा जप संपूर्ण भारतभर गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर करण्यात येणार आहे.

आज देशभर होणार १३ करोड रामनामाचा जप !
पिंपळगाव बसवंत : प्रभुरामचंद्रांच्या अयोध्या या जन्मभूमीत मंदिर निर्माण व्हावे यासाठी ‘श्री राम जय जय राम’ या विजयी महामंत्राचा जप संपूर्ण भारतभर गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर करण्यात येणार आहे. सूर्योदयापासून दीड तासाच्या आत एक करोड हिंदू बांधव तेरा माळी जप करणार असल्याची माहिती विश्व हिंदू परिषदेतर्फे देण्यात आली. यासाठी वस्तीत, गावात, प्रखंड आत नगरात, मंदिर हॉल तसेच पिंपळगाव बसवंत येथील राममंदिर, हनुमाननगर, अंबिका नगर, साईनगर, एनडीसीसी कॉलनी, घोडके नगर, शिवाजीनगर आदी ठिकाणच्या मंदिरात व मैदानात बैठकी घेण्यात आल्या. प्रत्येक बैठकीत ‘श्रीराम जय राम’ नामाच्या जपाबाबत आवाहन करण्यात आले. यावेळी संजय सोनवणे, अमित डेरे, मेधने मामा, ज्ञानेश्वर बनकर, नाना कुमावत, हनुमंत शेवरे, विजय जाधक, किरण डेरे, मनोज शेवरे, योगेश आहेर, लखन शिंदे,दशरथ गायकवाड आदींसह राम भक्त उपस्थित होते.