गंगापूररोड, कॉलेजरोडवरील वाहतूक मार्गांत बदल
By Admin | Updated: May 9, 2014 23:59 IST2014-05-09T22:48:13+5:302014-05-09T23:59:22+5:30
नाशिक : बारा बंगला जलशुद्धीकरण केंद्र ते नीलगिरी बाग येथे नव्याने सुरू होणार्या जलशुद्धीकरण केंद्रासाठी पाइपलाइन करण्यात येणार आहे. त्यामुळे कॉलेजरोड, गंगापूररोड परिसरातील वाहतूक मार्गांत बदल करण्यात आला आहे.

गंगापूररोड, कॉलेजरोडवरील वाहतूक मार्गांत बदल
नाशिक : बारा बंगला जलशुद्धीकरण केंद्र ते नीलगिरी बाग येथे नव्याने सुरू होणार्या जलशुद्धीकरण केंद्रासाठी पाइपलाइन करण्यात येणार आहे. त्यामुळे कॉलेजरोड, गंगापूररोड परिसरातील वाहतूक मार्गांत बदल करण्यात आला आहे.
पाइपलाइन टाकण्याचे काम कॉलेजरोड, गंगापूररोडने होणार असल्याने या मार्गांतील वाहतुकीचे नियोजन बदलण्यात आले आहे. सदर काम हे रस्त्याच्या कडेने करण्यात येणार असून, यापैकी बीवायके सर्कल, कॉलेजरोड व दिवट्या बुधल्या चौक गंगापूररोड या ठिकाणी वाहतुकीच्या मार्गावरून क्रॉसिंग करून जलशुद्धीकरणाची पाइनलाइन टाकण्यात येणार आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक वळविण्यात आली आहे. त्यामुळे कॉलेजरोड व गंगापूररोड क्रॉसिंगच्या ठिकाणी रस्ता क्रॉसिंग करून पाइपलाइन टाकण्याचे काम पूर्ण होईपर्यंत हा बदल असणार आहे.
सदर पाइपलाइन ही बारा बंगला जलशुद्धीकरण केंद्र ते बीवायके सर्कल- थत्तेनगर-दिवट्या बुधल्या चौक-गंगापूरोड-विद्याविकास सर्कल-मामा मुंगी कार्यालयापासून-जुने पंपिंगस्टेशन-कुसुमाग्रज उद्यान-गोदावरी नदीच्या पाइपलाइनसाठी टाकलेल्या पुलावरून-शेतातून-मखमलाबाद रोड जगझाप मार्ग जंक्शन-कॅनॉलरोड-नवीन मार्केट यार्डचे बाजूने-पेठरोड-तारवालानगर-शेतमार्गाने एसएसडीनगर-मुंबई आग्रारोड आरोग्यधाम विडी कामगार ते कॅनॉलजवळील नीलगिरी बाग येथील प्रस्तावित नवीन जलशुद्धीकरण केंद्र याप्रमाणे टाकण्यात येणार आहे. सदर काम हे रस्त्याच्या कडेने होणार आहे.
बीवायके सर्कल- कॅनडा कॉर्नरकडून बीवायके कॉलेजकडे जाणारा मार्ग बीवायके सर्कल चौफुलीच्या ठिकाणी दोन्ही बाजूने वाहतुकीसाठी बंद राहणार आहे.
पर्यायी मार्ग- कॅनडा कॉर्नरकडून बीवायके कॉलेजकडे जाणारी सर्व वाहने ही श्रद्धा मॉल चौकापासून डाव्या बाजूने वळण घेऊन हॉटेल सायंतारा- येवलेकरमार्ग-शिर्केमळा-कीर्ती सोसायाटी-जॉगिंग ट्रॅक-उजव्या बाजूने वळण घेऊन-कुशीनगर हौसिंग सोसायटी-डॉन बास्को स्कूल चौफुलीपर्यंत येऊन पुन्हा कॉलेजरोडने पुढे मार्गक्रमण करतील.
भोसला स्कूलकडून कॉलेजमार्गे येणारी वाहने ही डॉन बॉस्को स्कूल चौफुलीपर्यंत आल्यानंतर उजव्या बाजूने कुशीनगर हौसिंग सोसायटीतून श्रद्धा मॉलपर्यंत येतील तेथून पुन्हा कॉलेजरोडने कॅनडा कॉनर्रपर्यंत जातील.
गंगापूररोड- आनंदवल्लीकडून अशोकस्तंभाकडे जाणारा मार्ग व अशोकस्तंभाकडून आनंदवल्लीकडे जाणारा मार्ग हा हॉटेल दिवट्या बुधल्यापर्यंत दोन्ही बाजूने बंद राहणार आहे.
पर्यायी मार्ग- आनंदवल्लीकडून येणारी वाहने ही जेहान सर्कलला आल्यानंतर उजव्या बाजूने क्रोमा शोरूम-निर्माण हाउस चौफुली-कमल रेसिडेन्सी-डाव्या बाजूने विद्याविकास सर्कल पर्यंत आल्यानंतर गंगापूररोडने इतरत्र जातील. अशोकस्तंभाकडून जाणारी वाहनेदेखील विद्याविकास सर्कल, कमल रेसिडेन्सी-निर्माण हाउस चौक ते डॉन बॉस्को सेंटरच्या मागील रस्त्याने जेहान सर्कल याच मार्गाचा अवलंब करतील.