कार्यालयाच्या वेळेत बदल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2020 00:07 IST2020-03-19T22:45:20+5:302020-03-20T00:07:09+5:30
मालेगाव : राज्यात सर्वत्र कोरोना आजाराचा प्रादूर्भाव होत असून नागरिकांची गर्दी कमी करण्याच्या अनुषंगाने उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने आपल्याकार्यालयीन कामकाजाच्या ...

कार्यालयाच्या वेळेत बदल
मालेगाव : राज्यात सर्वत्र कोरोना आजाराचा प्रादूर्भाव होत असून नागरिकांची गर्दी कमी करण्याच्या अनुषंगाने उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने आपल्याकार्यालयीन कामकाजाच्या वेळत बदल केला असलन कार्यालयातील कामकाज कमी करण्यात आले आहे.
या अर्जदारांनी दि. ३१ मार्चपर्यंत शिकाऊ अनुज्ञप्तीची वेळ घेतलेली आहे त्यांच्या आगाऊ वेळ रद्द करण्यात आलेल्या आहेत. त्यांनी दि. ३१ मार्चपुढील आगाऊ वेळ घ्यावी. ज्या अर्जदारांनी दि. ३१ मार्चपर्यंत पक्की अनुज्ञप्तीची वेळ घेतलेली आहे त्यांच्या देखील आगाऊ वेळरद्द समजण्यात यावी. त्या सर्व अर्जदारांनी दि. ३१ मार्च नंतरची आगाऊ वेळ घेण्यात यावी. परंतु वाहनांची पुर्ननोंदणी, योग्यता प्रमाणपत्राचे नूतनीकरणाचे परवाना संबंधीचे कामकाज करण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त वाहन हस्तांतरण, वित्त दात्याचा बोजाबाबतचे व इतर संपूर्ण कामकाज बंद राहणार आहे. सर्व नवीन वाहन नोंदणीचे कामकाज होणार आहे. सर्व नागरिकांनी स्वत:च्या व कार्यालयीन अधिकारी, कर्मचारी यांच्या आरोग्याचा विचार करुन कार्यालयास सहकार्य करण्याचे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी केले आहे.
ज्या अर्जदारांची शिकावू अनुज्ञप्तीची मुदत दि. ३१ मार्चपर्यंत संपत आहे व दि. ३१ मार्च पर्यंत आगावू वेळ घेतलेली आहे अशा अर्जदारांची पक्की अनुज्ञप्तीची चाचणी दिलेल्या वेळेत घेण्यात येणार आहे. सर्व मासिक शिबिरे दि. ३१ मार्चपर्यंत बंद करण्यात आलेली आहे. उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात दि. ३१ मार्चपर्यंत फक्त अनुज्ञप्तीचे नूतनीकरण वगळता इतर संपूर्ण कामकाज बंद राहणार आहे.