वातावरणात बदल; कांद्याला लागले डोंगळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2019 00:01 IST2019-02-23T23:19:00+5:302019-02-24T00:01:42+5:30
जिल्ह्यात मागील तीन महिन्यांपासून सतत घसरणाऱ्या भावामुळे कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झालेला असताना येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुक, खडकीमाळ, देशमाने, मुखेड, सत्यगाव आदी परिसरात कांद्याला मोठ्या प्रमाणात डोंगळे आल्याने शेतकरी आणखीनच धास्तावला आहे.

वातावरणात बदल; कांद्याला लागले डोंगळे
मानोरी : जिल्ह्यात मागील तीन महिन्यांपासून सतत घसरणाऱ्या भावामुळे कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झालेला असताना येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुक, खडकीमाळ, देशमाने, मुखेड, सत्यगाव आदी परिसरात कांद्याला मोठ्या प्रमाणात डोंगळे आल्याने शेतकरी आणखीनच धास्तावला आहे.
कांदा पिकाला सर्व प्रकारची औषध फवारणी करून विक्र मी उत्पादन घेण्याच्या आशेवर पूर्णत: पाणी फेरले असून, अचानक वातावरणात झालेल्या बदलामुळे लाल कांद्याला मोठ्या प्रमाणात डोंगळे आल्याने कांदा बारीक राहिला आहे. ज्या कांद्याला डोंगळा आला तो कांदा पोकळ पडत असून, आधीच पाण्याचा काटकसरीने वापर करून कांदा पीक जगविण्याचा प्रयत्न शेतकरी करीत असताना कांदा पोकळ पडल्याने कांद्याच्या वजनातदेखील कमालीची घट होणार आहे. सदर कांदा जास्त दिवस ठेवण्याच्या परिस्थितीत नसल्याने कमी दरातच नवीन लाल कांद्याची विक्र ी शेतकºयांवर ओढवणार असल्याचे चित्र आहे. दरवर्षी मानोरी परिसरात बहुतांश शेतकरी एकरी १२० ते १५० क्विंटलच्या आसपास निघणारे उत्पादन यंदा एकरी ५० क्विंटलवर येऊन ठेपणार असल्याची माहिती कांदा उत्पादकांनी दिली आहे.