Changes in city traffic for 'Mahajandesh Yatra' | ‘महाजनादेश यात्रे’निमित्त शहरातील वाहतूक मार्गात बदल
‘महाजनादेश यात्रे’निमित्त शहरातील वाहतूक मार्गात बदल

नाशिक : महाजनादेश यात्रेनिमित्त येत्या बुधवारी (दि.१८) शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून वाहतूक मार्गात बदल करण्यात आला असून, याबाबतची अधिसूचना सोमवारी (दि.१६) शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या उपआयुक्त पौर्णिमा चौगुले यांनी जारी केली.
बुधवारी दुपारी ३ वाजता बाइक रॅलीला  सुरु वात होणार आहे. पाथर्डी फाटा-अंबड लिंक रोड-उत्तमनगर चौक-पवन नगर-सावतानगर-सिडको त्रिमूर्ती चौक , उंटवाडी सिग्नलवरून संभाजी चौक-दक्षिण मुखी हनुमान मंदिरामार्गे मायको सर्कल-तरणतलाव सिग्नलमार्गे हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर येणार आहे. त्याचप्रमाणे ४ वाजेनंतर त्र्यंबकनाका सिग्नल-जी.पी.ओ.रोडवरून गंजमाळ सिग्नल-शालिमार-नेहरू उद्यान-शिवाजी रोड- संत गाडगे महाराज पुतळा चौक-मेन रोड-धुमाळ पॉइंट - रविवार कारंजा-पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर पूल -मालेगाव स्टँड-पंचवटी कारंजा या मार्गावरून महाजनादेश यात्रेचा रोड शो होणार आहे.
असा आहे पर्यायी मार्ग
पाथर्डीफाटा ते सिडको हॉस्पिटल या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. नागरिकांनी अंबडगाव-गरवारे टी पॉइंट-या पर्यायी मार्गाचा अवलंब करावा.
सिडको रुग्णालय ते उत्तमनगर या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद असणार आहे. त्याकाळात नागरिकांनी आयटीआय पूल, डिजीपीनगर-२रोड, खुटवडनगररोड अशा पर्यायी मार्गाचा वापर करावा.
उत्तमनगर ते त्रिमूर्तीचौक वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद राहणार आहे. नागरिकांनी विजयनगर रोड, कामटवाडे रोड अन्य पर्यायी रस्त्यांचा वापर करावा.
नागरिकांनी सातपूररोड, शरणपूररोड सिग्नल पावेतो तेथून गंगापूररोड, गोविंदनगर, आयटीआय पूल मार्गाचा वापर करावा.
मायको सर्कल ते त्र्यंबकनाका सिग्नलपर्यंत बंद असणार आहे. नागरिकांनी शरणपूररोड, चांडक सर्कल, सारडा सर्कल, मुंबईनाका या पर्यायी मार्गाचा वापर करावा.
त्र्यंबकनाका सिग्नल ते गंजमाळ सिग्नल, शालिमार ते सारडा कन्या विद्यालय, नामको बँक ते तिरंगा चौक, मेनरोड वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद राहणार आहे. त्या काळात नागरिकांनी सारडा सर्कल, गडकरी चौक, भद्रकाली, भाजीबाजार, गाडगेमहाराज पूल, अशोकस्तंभ, गंगापूर रोड, मुंबईनाका अन्य पर्यायी मार्गांचा वापर करावा.
गाडगे महाराज पुतळा ते मेनरोड धुमाळ पॉइंट, रविवार कारंजा- होळकर पूल वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद असणार आहे. त्या काळात नागरिकांनी गंजमाळ सिग्नल, सारडा सर्कल, शालिमार, रेडक्रॉस सिग्नल, वकीलवाडी, अशोकस्तंभ, गंगापूररोड अन्य पर्यायी मार्गांचा वापर करावा.
होळकर पूल ते पंचवटी कारंजा वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद असणार आहे. नागरिकांनी अशोक स्तंभ,गंगापूररोड, मखमलाबाद रोड, पेठरोडसह अन्य पर्यायी मार्गाचा वापर करावा.


Web Title:  Changes in city traffic for 'Mahajandesh Yatra'
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.