पालिकेने जागेचा ठराव बदलावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 00:30 IST2018-03-16T00:30:58+5:302018-03-16T00:30:58+5:30
येवला : १८५७ च्या स्वातंत्र्य युद्धाचे सरसेनापती, येवला शहराचे भूमिपुत्र तात्या टोपे यांचे नियोजित राष्ट्रीय स्मारक अडगळीच्या जागेत व्हायला नको. पालिकेने त्या जागेबाबत करण्यात आलेला ठराव बदलण्यात यावा आणि सुयोग्य जागी व्हावे, अशा मागणीचे निवेदन येवला पालिकेच्या मुख्याधिकारी प्रतिभा पाटील यांना भाजपाच्या शहर पदाधिकारी यांनी दिले. दरम्यान, शहर विकास आघाडीचे गटनेते नगरसेवक रुपेश लोणारी यांनीदेखील स्मारक योग्य जागी व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

भाजपा शहर अध्यक्ष आनंद शिंदे, भाजपा नेते धनंजय कुलकर्णी,
गणेश खळेकर, मयूर मेघराज, दिनेश परदेशी, गणेश गायकवाड, सुनील सस्कर, संजय आचारी, दीपक खेरूड, दत्तात्रय नागडेकर, बडाअण्णा शिंदे यांनी हे निवेदन मुख्याधिकारी यांना दिले. या निवेदनात म्हटले आहे की, तात्या टोपे यांचे सुमारे साडेदहा कोटी रुपये खर्चाचे अद्वितीय स्मारक निर्माण करण्याचे केंद्र शासनाने नियोजित केले आहे. यापैकी साडेतीन कोटी रुपयांचा निधीदेखील पालिकेकडे वर्ग झाल्याची माहिती आहे.
पालिकेने या स्मारकाच्या निर्मितीसाठीची प्रक्रियादेखील सुरू केली आहे. हे स्मारक कोर्ट मैदानाजवळील पर्यटकांना येण्या-जाण्यासाठी रस्तादेखील नसलेल्या साठवण तलावाकडील नांदूररोड लगत गैरसोयीची असलेल्या अडचणीच्या जागी होत आहे.
या जागेबाबत येवला शहरातील नागरिकांचा विरोध आहे. येवला पालिकेने केवळ पैसे परत जाऊ नये यासाठी घाईघाईने अडगळीच्या जागी केलेला ठराव बदलावा, अशी मागणी केली आहे.