चांदवडच्या लाचखोर हवालदारास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2020 00:22 IST2020-07-23T21:38:55+5:302020-07-24T00:22:16+5:30
चांदवड : चांदवड पोलीस स्टेशनमधील हवालदारांला पोलीस स्टेशनला दाखल असलेल्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी पाच हजार रुपयाची लाच घेताना नाशिक येथील लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून पकडले.

चांदवडच्या लाचखोर हवालदारास अटक
चांदवड : चांदवड पोलीस स्टेशनमधील हवालदारांला पोलीस स्टेशनला दाखल असलेल्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी पाच हजार रुपयाची लाच घेताना नाशिक येथील लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून पकडले.
याबाबत चांदवड तालुक्यातील दहेगाव येथील एक ४२ वर्षीय पुरुषास त्याची चांदवड पोलीस स्टेशनला दाखल असलेल्या गुन्ह्यात मदत करू, असे आश्वासन देत पोलीस हवालदार अशोक सुखदेव फुलमाळी यांनी पाच हजार रुपयाची मागणी केली. अशी तक्रार दाखल झाल्याने दि. २३ जुलै रोजी सापळा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक सुनील कडासने, अपर पोलीस अधीक्षक नीलेश सोनवणे, सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक संदीप साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रभाकर निकम, वैभव देशमुख, प्रवीण महाजन, नितीन कराड, संतोष गांगुर्डे यांनी सापळा रचून फुलमाळी यांना ताब्यात घेतले याबाबत पाच हजार रुपयांसह रंगेहाथ पकडले म्हणून गुन्हा दाखल झाला आहे.