चांदवडला डावखर नगरमध्ये ९७ हजारांची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2019 12:24 AM2019-05-08T00:24:21+5:302019-05-08T00:24:35+5:30

चांदवड : शहरातील डावखरनगरात राहणारे शासकीय कर्मचारी भाऊसाहेब दगा शेवाळे हे अक्षय तृतीयेच्या सणानिमित्त सोमवारी सायंकाळी ८ वाजता मालेगाव कॅम्प येथे आईवडिलांकडे गेले होते, तर त्यांची पत्नी मुलांसह माहेरी गेल्या होत्या.

Chandwadla stole 9 7 thousand stolen in Davkar Nagar | चांदवडला डावखर नगरमध्ये ९७ हजारांची चोरी

चांदवडला डावखर नगरमध्ये ९७ हजारांची चोरी

Next
ठळक मुद्दे याबाबत अधिकृत सूत्रांकडून माहिती मिळालेली नाही.

चांदवड : शहरातील डावखरनगरात राहणारे शासकीय कर्मचारी भाऊसाहेब दगा शेवाळे हे अक्षय तृतीयेच्या सणानिमित्त सोमवारी सायंकाळी ८ वाजता मालेगाव कॅम्प येथे आईवडिलांकडे गेले होते, तर त्यांची पत्नी मुलांसह माहेरी गेल्या होत्या.
घरात कोणीच नसल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी शेवाळे यांच्या घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून प्रवेश केला. बेडरूमच्या लोखंडी कपाटात ठेवलेले ३२ हजार रु पये किमतीची सोन्याची पोत, ५० हजार रुपये किमतीची सोन्याची चैन व १५ हजारांची रोकड असा एकूण ९७ हजारांचा ऐवज लंपास केला. ही घटना शेजारील रहिवाशांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी शेवाळे यांना संपर्क साधून माहिती दिली. शेवाळे यांनी घरी येऊन खात्री केली असता घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेले व कपाटातील दागिने व रोकड लंपास झाल्याचे दिसून आले.
याबाबत शेवाळे यांनी चांदवड पोलिसांत फिर्याद दिली. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे. घटनेनंतर मनमाड उपविभागाच्या सहायक पोलीस अधीक्षक रागसुधा आर, पोलीस निरीक्षक संजय पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. याबाबत अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल केदारे करीत आहेत. दरम्यान गणेश कॉलनीत एका रात्रीत तीन ते चार ठिकाणी चोरी झाल्याचे समजते. याबाबत अधिकृत सूत्रांकडून माहिती मिळालेली नाही.

Web Title: Chandwadla stole 9 7 thousand stolen in Davkar Nagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.