चांदवडला सुमारे सात लाखाचा गुटखा जप्त : मनमाड उपअधिक्षकांची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 16:25 IST2018-10-27T16:24:41+5:302018-10-27T16:25:23+5:30
चांदवड - चांदवड येथील बसस्थानकासमोरील एका होलसेल दुकानात गुटखा,विमल, हिरा, आर एम डी , आदि माल विक्र ी करीत असतांना मनमाड विभागाच्या पोलिस उपविभागीय अधिकारी श्रीमती रागसुधा आर यांनी त्यांच्या पथकाच्या सहाय्याने दुकानावर छापा टाकून दुकानदाराच्या राहत्या घरी छापा मारुन सुमारे ६ लाख ९२ हजार ४०५ रुपयांचा मालाचा साठा जप्त केला

चांदवडला सुमारे सात लाखाचा गुटखा जप्त : मनमाड उपअधिक्षकांची कारवाई
चांदवड - चांदवड येथील बसस्थानकासमोरील एका होलसेल दुकानात गुटखा,विमल, हिरा, आर एम डी , आदि माल विक्र ी करीत असतांना मनमाड विभागाच्या पोलिस उपविभागीय अधिकारी श्रीमती रागसुधा आर यांनी त्यांच्या पथकाच्या सहाय्याने दुकानावर छापा टाकून दुकानदाराच्या राहत्या घरी छापा मारुन सुमारे ६ लाख ९२ हजार ४०५ रुपयांचा मालाचा साठा जप्त केला तर या दुकानदाराने हा माल घरात तसेच घरामागे मोकळया जागेमध्ये खोल खड्डा करून माल लपवून ठेवला जात होता. सदर घटनेची गोपनीय खबर श्रीमती रागसुधा आर यांना मिळताच त्यांनी पोलीस कर्मचारी कैलास खैरे , दिपाली आव्हाड, पोकॉ सोपान मुंडे, दिलीप पगारे यांनी ही कामगिरी केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.