चांदवडला दोन इंडिका कार आगीत भस्मसात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 18:07 IST2017-12-27T18:07:16+5:302017-12-27T18:07:33+5:30
चांदवड -चांदवड परिसरात दोन इंडिका कार आगीत पुर्णपणे भस्मसात झाल्या नाशिककडून मालेगावकडे जात असलेल्या इंडिका कार व्हिस्टा कार क्रमांक एम.एच. 41 व्ही 2607 ही मंगरुळ टोलनाक्यावर जात असतांना महामार्गावर तिने अचानक पेट घेतल्याने कारमधुन धुर बाहेर येत असल्याचे लक्षात येताच कारमधील प्रवासी बाहेर पडले सोमा टोलच्या अग्नीशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली.

चांदवडला दोन इंडिका कार आगीत भस्मसात
चांदवड -चांदवड परिसरात दोन इंडिका कार आगीत पुर्णपणे भस्मसात झाल्या नाशिककडून मालेगावकडे जात असलेल्या इंडिका कार व्हिस्टा कार क्रमांक एम.एच. 41 व्ही 2607 ही मंगरुळ टोलनाक्यावर जात असतांना महामार्गावर तिने अचानक पेट घेतल्याने कारमधुन धुर बाहेर येत असल्याचे लक्षात येताच कारमधील प्रवासी बाहेर पडले सोमा टोलच्या अग्नीशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. कर्मचाºयांनी आग विझविणाचा प्रयत्न केला. मात्र ही कार पुर्णपणे पेटून जळुन खाक झाली होती. दुसºया घटनेत शहरातील अल्ताफ शकील मिर्झा यांच्या अहिल्यादेवी कॉलनीच्या पाठीमागील बाजुस असलेल्या घराजवळ उभ्या असलेल्या इंडिका कार क्रमांक एम.एच. 15/बी.डी.0879 हीने मंगळवारी दुपारी अचानक पेटली . व कार पुर्णपणे खाक झाली. सोमा टोलच्या अग्निशमन दलाच्या कर्मचाºयांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला मात्र कारपुर्णपणे बेचिराखझाली
चांदवड शहरात नगरपरिषदेची स्थापना होऊन दोन ते तीन वर्षाचा कालावधी झाला असतांना स्वतंत्र अग्नीशामन दलाचे बंब नाही व नगरपरिषदेस अग्निशमन वाहन व कर्मचारी नसल्याने एकट्या सोमा टोल वे च्या अग्निशमन दलावरच भार येत आहे याबाबत चांदवडचे नगराध्यक्ष भूषण कासलीवाल यांच्याशी संपर्क साधला असता अग्निशमन विभागाकडे प्रस्ताव पाठविला असल्याचे त्यांनी सांगीतले.याबाबत चांदवड पोलीसांकडे आगीची नोंद झाली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.