चांदवडला आढळले कोरोनाचे आठ नवे रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 23:51 IST2021-02-22T20:47:35+5:302021-02-23T23:51:36+5:30
चांदवड : येथे कोरोनाचे नवे आठ रुग्ण आढळून आले. २५ व्यक्तीपैकी आठ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

चांदवडला आढळले कोरोनाचे आठ नवे रुग्ण
तालुक्यातील आडगाव येथील ४८ वर्षीय पुरुष, हिवरखेडे येथील ३० वर्षीय महिला, चांदवड नगरपरिषद कॉन्ट्रक्टर ४५ वर्षीय पुरुष, संत रोहिदास नगर ४२ वर्षीय पुरुष, रायपूर येथील पाच वर्षीय बालक, रायपूर येथील २९ वर्षीय पुरुष, चांदवड इंद्रायणी कॉलनी ५८ वर्षीय पुरुष, चांदवड फुलेनगर ५१ वर्षीय पुरुष असे एकूण आठ जण पॉझिटिव्ह आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.पंकज ठाकरे यांनी दिली. विनामास्क आढळून आल्यास एक हजार रुपये दंड भरावा लागेल. तर गर्दीत जाणे टाळा, दोन फुटांचे भौतिक अंतर ठेवा, शासन नियमांचे पालन करा, असे आवाहन तहसीलदार प्रदीप पाटील यांनी केले आहे.