चांदवडला डॉक्टरांना पीपीई कीट वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2020 22:59 IST2020-05-04T21:08:53+5:302020-05-04T22:59:08+5:30

चांदवड : तालुका रूग्णालयात कॉंग्रेसचे माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल यांच्या हस्ते व प्रांतिक सदस्य भारत टाकेकर यांच्याकडून पीपीई किट वाटप सोमवार दि. ४ मे रोजी करण्यात आले.

 Chandwad distributes PPE kits to doctors | चांदवडला डॉक्टरांना पीपीई कीट वाटप

चांदवडला डॉक्टरांना पीपीई कीट वाटप

चांदवड : तालुका रूग्णालयात कॉंग्रेसचे माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल यांच्या हस्ते व प्रांतिक सदस्य भारत टाकेकर यांच्याकडून पीपीई किट वाटप सोमवार दि. ४ मे रोजी करण्यात आले.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष ना. बाळासाहेब थोरात यांच्या आदेशान्वये चांदवड ग्रामीण तालुका रुग्णालयात हे कीट वाटप करण्यात आले यावेळी जिल्हा कॉंग्रेस उपाध्यक्ष रमेश कहांडोळे, अनुसूचित जाती विभाग अध्यक्ष ज्ञानेश्वर काळे, तालुका अध्यक्ष संजय जाधव, तालुका कार्याध्यक्ष समाधान जामदार उपस्थित होते. ़
तालुका रु ग्णालयाचे डॉ यादव, डॉ. राजपूत, परिचारीका भारती सावंत, आशा खारके, रंजना गावित, स्वाती भामरे, ज्योती गांगुर्डे आदींना पीपीई किट वाटप करण्यात आले. कोरोना महामारीत देशातील आणि राज्यातील डॉक्टर, पोलीस, सफाई कामगार आपलं महत्त्वपूर्ण योगदान देत आहेत. म्हणुन आपण देखील त्या सर्वांची काळजी घेणं. त्यांना सहकार्य करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी आहे.
त्या अनुषंगाने शक्य होईल ते सहकार्य करण्याचे आपण ठरल्यांनच प्रत्येक तालुक्यातील ग्रामीण रु ग्णालयात पीपीई किटचे वाटप करत असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title:  Chandwad distributes PPE kits to doctors

टॅग्स :Nashikनाशिक