शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
4
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
5
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
6
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
7
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
8
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
9
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
10
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
11
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
12
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
13
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
14
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल
15
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
16
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
17
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
18
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
19
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
20
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप

चेंबर दुर्घटना : मनपाच्या गलथान कारभाराचा अजीम बळी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2019 17:09 IST

एका चेंबरमध्ये पडून सात वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या चिमुकल्याच्या मृत्यूला नेमके कोण जबाबदार? असा प्रश्न येथील संतप्त रहिवाशांनी उपस्थित केला असून आजीम हा लहानगा प्रशासकीय उदासिनतेचा बळी ठरल्याची भावना व्यक्त केली.

ठळक मुद्दे‘त्या’ दोघींचे प्रसंगावधान पण...,नुकसानभरपाईची मागणीसात वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

नाशिक : महापालिकेच्या भूयारी गटारीच्या उघड्या चेंबरच्या बाबतीत अनेकदा ओरड केली जाते; मात्र असे चेंबर अपघात जोपर्यंत घडत नाही, तोपर्यंत संबंधित विभागाकडून बंदिस्त केले जात नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. वडाळागावातील सादिकनगर भागात अशाच एका चेंबरमध्ये पडून सात वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या चिमुकल्याच्या मृत्यूला नेमके कोण जबाबदार? असा प्रश्न येथील संतप्त रहिवाशांनी उपस्थित केला असून आजीम हा लहानगा प्रशासकीय उदासिनतेचा बळी ठरल्याची भावना व्यक्त केली.भूमीगत गटारींच्या चेंबरमध्ये पडून मजूरापासून प्राण्यांपर्यंत मृत्यूच्या अनेकदा घटना घडल्या आहेत; मात्र याबाबत महापालिका प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात असल्याने या घटना अद्यापही थांबलेल्या नाहीत. वडाळागावातील महेबुबनगर, सादिकनगर, साठेनगर हा स्लम परिसर आहे. या भागात बहुतांश चेंबरवरील ढापे गायब झाले असून मनपाने ते चेंबर बंदिस्त करण्याची मागणी वारंवार केली जाते, मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याने अशाप्रकारच्या दुदैर्वी घटना घडत असल्याचे येथील रहिवाशी लाला शहा, इरफान शेख, युनुस खान, फिरोज फारूखी, जबेर खान आदिंनी सांगितले. उघडे चेंबर वेळोवेळी मनपाच्या भूयारी गटार विभागाने बंदिस्त केल्यास लहान मुलांपासून मुक्या प्राण्यांपर्यंत कोणाचाही जीव जाणार नाही, असे नागरिकंनी म्हटले आहे.‘त्या’ दोघींचे प्रसंगावधान पण...,मनपाच्या उर्दू शाळेत इयत्ता दुसरीत शिकणारा आजीम जुबेर खान (७) हा चिमुकला साधारणत: आठवडाभरापुर्वी सादिकनगरमधील एका गल्लीत असलेल्या उघडल्या चेंबरमध्ये पडला. यावेळी आजिम जोरात ओरडला, त्याच्या ओरडण्याचा आवाज ऐकून तत्काळ सुरय्या शेख, जकिया शेख या महिलांनी चेंबरच्या दिशेने धाव घेतली. दोघींनी क्षणाचाही विलंब न लावता आजिमला कसेबसे तत्काळ बाहेर काढले. तोपर्यंत स्थानिक नागरिकांची चेंबरभोवती मोठी गर्दी जमली होती. चिमुकल्याच्या डोक्याला जबर मार लागल्याने जिल्हा रूग्णालयात उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत गुरूवारी (दि.२८) मालवली.नुकसानभरपाईची मागणीचिमुकला आजीमचा चेंबरच्या ढाप्यात कोसळून मृत्यू झाला. यास मनपाचा गलथान कारभार जबाबदार आहे. अजिमचे कुटुंब अत्यंत गरीब असून वडील फळविक्रेता आहे. अजिम अभ्यासात हुशार असल्याने सादिकनगरमध्ये तो सर्वांचाच लाडका होता. त्याच्या अचानकपणे जाण्याने मोठा आघात कुटुंबियांवर झाला. तसेच संपुर्ण परिसरात शोककळा व्यक्त होत आहे. या कुटुंबाला महापालिका प्रशासनाने नुकसानभरपाई म्हणून आर्थिक मदत देण्याची मागणी रहिवाशांनी केली आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाAccidentअपघातDeathमृत्यूStudentविद्यार्थी