शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
2
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
3
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
4
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
5
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
6
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
7
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
8
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
9
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
10
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
11
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
12
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
13
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
14
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
15
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
16
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
17
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
18
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
19
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
20
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

मदतीच्या घोषणेनंतर प्रशासनासमोर फेरमूल्यांकनाचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2019 01:02 IST

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दोन हेक्टरपर्यंतच्या नुक सान झालेल्या क्षेत्रासाठी मदतीची घोषणा केल्यानंतर जिल्ह्यातील पीडित शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी जिल्हा प्रशासनासमोर नुकसानग्रस्त क्षेत्राचे पुनर्मूल्यांकन करण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.

नाशिक : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दोन हेक्टरपर्यंतच्या नुक सान झालेल्या क्षेत्रासाठी मदतीची घोषणा केल्यानंतर जिल्ह्यातील पीडित शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी जिल्हा प्रशासनासमोर नुकसानग्रस्त क्षेत्राचे पुनर्मूल्यांकन करण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.राज्यपालांनी शनिवारी (दि.१६) राज्यातील नुकसानग्रस्त शेतकºयांना खरीप पिकासाठी हेक्टरी ८ हजार रुपये व बारमाही तथा फलोत्पादन पिकांसाठी १८ हजार रुपये मदतीची घोषणा केली. परंतु, ही मदत दोन हेक्टरपर्यंतच्या नुकसान झालेल्या क्षेत्रासाठीच देण्याची अट असल्याने मदतीची रक्कम प्रत्यक्ष शेतकºयांपर्यंत पोहोचविण्यासाठी जिल्हा प्रशासनाला आतापर्यंत संकलित केलल्या माहितीचे फेरमूल्यांकन करावे लागणार आहे.आतापर्यंत प्राप्त माहितीनुसार जिल्हाभरातील सात लाख ७६ हजार ९७० शेतकºयांच्या एकूण ६ लाख ४७ हजार ३१५ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याची माहिती उपलब्ध आहे. १ लाख ५६ हजार ३५०.७६ हेक्टर बागायती, ४ लाख ९ हजार २७५.८१ हेक्टर जिरायती व ८१ हजार ६८९ हेक्टर बारमाही तथा फलोत्पादन पिकक्षेत्राचा समावेश आहे. या माहितीचे राज्यपालांनी जाहीर केलेल्या मदत घोषणेच्या नियम निकषांनुसार पुनर्मूल्यांकन करून पीडित शेतकºयांपर्यंत लवकरात लवकर मदत पोहोचविण्याचे आव्हान जिल्हा प्रशासना समोर असणार आहे. दरम्यान, शेतकºयांना नुकसानभरपाई मिळण्यासाठी राज्यपाल शनिवारी नाशिक जिल्ह्णाचा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा घेणार होते. परंतु, राज्यपालांनी पूर्वनियोजित कार्यक्रम रद्द करून थेट मदतीची घोषणा केल्याने अतिवृष्टीने कोलमडून पडलेल्या शेतकºयांना काही प्रमाणात का होईना दिलासा मिळाला आहे.नुकसान लाखात, भरपाई हजारातपाटोदा : उभारी देण्यासाठी भरीव मदत मिळेल या आशेवर असलेल्या शेतकºयांना राज्यपालांनी हेक्टरी आठ हजार रु पये अशी तुटपुंजी मदत देण्याची घोषणा केल्याने शेतकरीवर्गातून नाराजी व्यक्त केली जात आहे. नुकसान लाखात झाले असून, मदत हजारात दिली जाणार असल्याने ही एक प्रकारे शेतकºयांची थट्टाच केली जात असल्याने नाराजी पसरली असून, शेतकºयांना अनुदान वाढवून देण्यात यावे अशी मागणी होत आहे.मका पिकासाठी हेक्टरी पस्तीस ते चाळीस हजार रु पये खर्च झालेला असून उत्पन्न सुमारे लाख रु पये निघाले असते. नुकसान लाखात होऊन भरपाई अनुदान हे फक्त आठ हजाररु पये जाहीर झाले आहे. तर द्राक्षबागासाठी हेक्टरी खर्च चार ते पाच लाखाच्या आसपास झालेला असून, हेक्टरी नुकसान वीस ते बावीस लाख रु पयांचे झालेले असताना हेक्टरी अठरा हजार असे तुटपुंजे अनुदान जाहीर झाल्याने शेतकºयांची बोळवण करून मोठी निराशा केली आहेनिर्यातक्षम द्राक्षबागेसाठी हेक्टरी पाच लाख रु पये खर्च झालेला आहे. मात्र परतीच्या पावसाने संपूर्ण द्राक्षबागेचा चुराडा झाला आहे नुकसानभरपाई अनुदान हेक्टरी अठरा हजार रु पये जाहीर झाल्याने ही एक प्रकारे शेतकºयांची थट्टाच केली आहे, असे द्राक्ष उत्पादक शेतकरी ज्ञानेश्वर बोरणारे यांनी म्हटले आहे.गेल्या तीन-चार वर्षांपासून दुष्काळी स्थितीचा सामना करीत असताना या वर्षी अमेरिकन लष्करी अळी व इतर संकटांशी दोन हात करून का होईना खरीप पिके चांगली आल्याने आनंदात असतानाच परतीच्या पावसाने हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे. मका पिकाचे हेक्टरी लाख ते दीड लाख रु पयांचे नुकसान झालेले असताना जाहीर झालेली अनुदान रक्कम म्हणजे शेतकºयांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार आहे.- रवींद्र शेळके, शेतकरी, ठाणगाव

टॅग्स :agricultureशेतीnashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालय