शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

नाशिकमध्ये अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराची ‘चाळिशी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2018 00:34 IST

शहर पोलीस आयुक्तालयातील तेरा विविध पोलीस ठाण्यांमध्ये जानेवारी ते नोव्हेंबर २०१८ अखेरपर्यंत अल्पवयीन मुले-मुलींवरील लैंगिक अत्याचाराचे चाळीस गुन्हे दाखल करण्यात आले आहेत़ त्यामध्ये लहान मुलींना चॉकलेटचे तर शाळकरी व महाविद्यालयातील अल्पवयीन मुलींना विवाहाचे आमिष दाखवून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केल्याच्या घटनांचा समावेश आहे़

लोकमत  विशेषनाशिक : शहर पोलीस आयुक्तालयातील तेरा विविध पोलीस ठाण्यांमध्ये जानेवारी ते नोव्हेंबर २०१८ अखेरपर्यंत अल्पवयीन मुले-मुलींवरील लैंगिक अत्याचाराचे चाळीस गुन्हे दाखल करण्यात आले आहेत़ त्यामध्ये लहान मुलींना चॉकलेटचे तर शाळकरी व महाविद्यालयातील अल्पवयीन मुलींना विवाहाचे आमिष दाखवून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केल्याच्या घटनांचा समावेश आहे़ मुलींवर लैंगिक अत्याचार होण्याचे प्रमाण सर्वाधिक असून, त्यामानाने मुलांवरील अत्याचाराचे प्रमाण कमी आहे़अल्पवयीनांमध्ये विशेषत: लहान मुलींना चॉकलेट वा इतर खाद्यपदार्थांचे आमिष दाखवून विकृत मनोवृत्तीच्या व्यक्तींकडून लैंगिक शोषण वा अत्याचार केले जात असल्याचे समोर आले आहे़ मुंबई नाका पोलीस ठाणे हद्दीतील एका शालेय परिसरात खेळत असलेली आठ वर्षीय मुलगी तर विद्यार्थिनींची ने-आण करणारा स्कूल व्हॅनचालक व्हॅनमधील दोन मुलींना मोबाइलवर अश्लील चित्रफीत दाखवून अत्याचार करीत होता़ राणेनगरच्या एका शाळेतील दहावीच्या विद्यार्थिनीला नापास करण्याची धमकी देऊन वर्गशिक्षकच अत्याचार करीत असल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला़ या अत्याचाराच्या या घटनांमुळे शालेय वातावरही शालेय मुलींसाठी सुरक्षित नसल्याचे समोर आले आहे़ शहरातील अल्पवयीन शाळकरी तसेच महाविद्यालयीन मुलींना प्रेमाच्या जाळ्यात फसविल्यानंतर विवाहाचे आमिष दाखवून अत्याचार केल्याच्या घटनांचे प्रमाण अधिक आहे़ यातील बहुतांश प्रकरणात तर मुलगी गर्भवती झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे़ तसेच बहुतांश प्रकरणात ओळखीच्याच लोकांनी अल्पवयींनावर अत्याचार केले आहेत़ शहरातील शाळा तसेच खासगी शिकवणीच्या ठिकाणी टवाळखोरी करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई करणे गरजेचे असून, याबरोबरच पालकांनीही मुलांशी संवाद साधणे आवश्यक आहे़शहर पोलिसांचा ‘से नो फर्स्ट’ उपक्रम लहान मुलांना लैंगिक अत्याचाराबाबत माहिती व्हावी यासाठी पोलीस आयुक्तालयामार्फत शहरातील विविध शाळा, महाविद्यालयांमध्ये ‘से नो फर्स्ट’ हा उपक्रम राबविला जातो़ महिला पोलीस अधिकारी शाळा तसेच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृती व उदाहरणांद्वारे मार्गदर्शन करतात़ लहान मुलांवर कशाप्रकारे अत्याचार होतात याची माहिती देऊन याबाबत पालकांकडे तक्रार करण्याचे तसेच संबंधित व्यक्तीस खडसावून नाही म्हणायला शिकण्याचे प्रशिक्षण दिले जाते़शाळेतील शिक्षक अद्यापही फरारअल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी नागरिकांनी बेदम मारहाण केलेला व पोलिसांत गुन्हा दाखल असलेला राणेनगर येथील सेंट फ्रान्सिस हायस्कूलचा शिक्षक सुनील कदम हा अद्यापही फरार आहे़ पोस्कोच्या गुन्ह्यात जिल्हा तसेच उच्च न्यायालयानेही कदमला जामीन नाकारल्याची माहिती पोलिसांनी दिली असली तरी अद्यापही त्याचा ठावठिकाणा शोधण्यास इंदिरानगर पोलिसांना यश आलेले नाही़महिला पोलीस अधिका-याकडून तपासशहर पोलीस आयुक्तालयातील तेरा विविध पोलीस ठाण्यांमध्ये लहान मुलांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण व्हावे यासाठी विविध उपक्रम राबविले जातात़ त्यामध्ये ‘से नो फर्स्ट’ तसेच महाविद्यालयातील मार्गदर्शन कार्यक्रमांचा समावेश आहे़ तसेच या प्रकारच्या गुन्ह्यांच्या तपासासाठी स्वतंत्र महिला अधिकाºयाची नेमणूक केली जाते़  - डॉ़ रवींद्र सिंगल, पोलीस आयुक्त, नाशिक

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयWomenमहिलाCrime Newsगुन्हेगारी