शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडकी बहीण’चा फटका; ‘आनंदाचा शिधा’ विसरा
2
कफ सिरप मृत्यू प्रकरणात मध्य प्रदेशात डॉक्टरची अटक; IMA आक्रमक, थेट सरकारलाच दिला इशारा!
3
९.१ कोटी नोकऱ्यांची मोठी संधी, तीन नोकऱ्यांपैकी एक नोकरी या क्षेत्रातून येणार...
4
गाढ झोपेतच काळाने घातला घाला! ४ वर्षीय चिमुकलीसह मावशीचा सर्पदंशाने मृत्यू; डॉक्टर निलंबित
5
वर्गात मित्राला कसे मारायचे? ChatGPT वर एक प्रश्न विचारला; विद्यार्थ्याला तुरुंगात जावे लागले
6
महसूल मंत्र्यांचा दुय्यम निबंधक कार्यालयातच छापा; अधिकाऱ्यांच्या ड्रॉवरमध्ये आढळले पैसे
7
संपादकीय: ...आता थेट मुकाबला ! आनंदाचा शिधा देणार नसले, तरी... 
8
दिवाळीत मोठ्या खरेदीसाठीसाठी 'क्रेडिट कार्ड'नं पैसे देणं योग्य आहे का?; 'या' गोष्टी लक्षात ठेवा
9
आजचे राशीभविष्य- ७ ऑक्टोबर २०२५: आजचा दिवस शुभ फलदायी, 'या' राशींची होणार भरभराट!
10
सरन्यायाधीशांवर वकिलाकडून बूट फेकण्याचा प्रयत्न ; ‘सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही’ अशा घोषणा देत कोर्ट सुरू असतानाच केला हल्ला 
11
कोणत्या नगरपरिषद, नगरपंचायतीसाठी कोणते आरक्षण; सोडत निकाल वाचा एका क्लिकवर... 
12
वांगचूक यांना अटक; केंद्र सरकार, लडाखला नोटीस; तत्काळ सुटका करण्याची सर्वोच्च न्यायालयात मागणी 
13
बिहार विधानसभेचा बिगुल अखेर वाजला; दोन टप्प्यांत मतदान, तर १४ नोव्हेंबरला निकाल   
14
मुंबई महापालिकेची अंतिम प्रभागरचना मंजूर; निवडणूक प्रक्रियेला वेग, मतदार याद्यांची प्रतीक्षा 
15
२४७ नगरपरिषदांमध्ये १२५ नगराध्यक्षपदे महिलांसाठी; तर १४७ नगरपंचायतींमध्ये ७३ महिलांसाठी राखीव 
16
ब्रुनको, रॅम्सडेल व साकागुची यांना मेडिसिनचे नोबेल; टी-पेशींचा शोध, कर्करोग आणि मधुमेहावर उपयुक्त
17
७ कोटींच्या घरांना ग्राहक मिळाले नाहीत, तर म्हाडा घरे भाड्याने देणार
18
परप्लेक्सिटीचा तांत्रिक बिघाड सोडवला, १ कोटीची नोकरी मिळाली; पालघर जिल्ह्यातल्या जितेंद्रची झाली निवड
19
लादेनच्या डोक्यात अमेरिकी नेव्ही सीलनेच गोळी झाडली होती, हे इतिहास विसरणार नाही : ट्रम्प
20
चंद्रभ्रमंती करून ‘स्पेस फ्लाइट’ने घरी परत याल, तेव्हा...

मुंबईच्या ‘चक्रम हायकर्स’ संस्थेच्या गिर्यारोहकाचा नाशिकच्या गडावरून कोसळून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 19:08 IST

हेमेंद्र हे पुण्यात  राहत होते. त्यांच्या पश्चात आई, वडील, बहीण, असा परिवार आहे. हेमेंद्र यांचा अचानकपणे पाय घसरल्याने त्यांचा दरीत तोल गेला. हेमेंद्र हे तरबेज गिर्यारोहक होते अनावधानाने त्यांचा पाय ज्या दगडावर पडला तो दगड निखळल्याने दुर्दैवी अपघात घडल्याचे सचिव अनिकेत रहाळकर यांनी सांगितले.

ठळक मुद्दे वैनतेयचे पथक सर्व आवश्यक साधनसामुग्री घेऊन वाडीव-हेच्या दिशेने रवाना हेमेंद्र हे जखमी अवस्थेत सापडले. त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने मृत्यू

नाशिक : वाडीव-हे शिवारातील गडगडसांगवी गावालगत असलेल्या आमळी गडावर ट्रेकिंगसाठी आलेल्या मुंबईच्या ‘चक्रम’ हायकर्स संस्थेच्या समूहातील एका ट्रेकर्सचा पाय घसरल्याने दरीत कोसळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी (दि.२४) घडली.वाडीव-हेपासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या आमळी पर्वतावर मुंबई येथील ‘चक्रम’ हायकर्स या प्रसिद्ध गिरीभ्रमंती करणाऱ्या संस्थेच्या १४ गिर्यारोहक गिर्यारोहणासाठी दाखल झाला होता. आमळी गडालगत असलेल्या पायथ्याच्या दहेगावात हे गिर्यारोहक मुक्कामी थांबलेले होते.‘चक्रम’मार्फत २३ ते २५ मार्च दरम्यान आमळी गड (गडगड्या), रांजणगिरी, बहुला, कावनई अशा ट्रेकिंग मोहीम आखळी होती. प्रणव नाफडे हे या मोहिमेचे प्रमुख, तर मंगेश पंडित हे उपप्रमुख म्हणून जबाबदारी पार पाडत होते. शनिवारी सकाळी गिर्यारोहकांनी आमळी गडावर चढाई करण्यास सुरुवात केली. या समूहातील काही ट्रेकर्स गडाच्या निम्म्यावर असलेल्या देवी मंदिरात विश्रांतीसाठी थांबले. गिर्यारोहणाच्या सर्व साहित्य घेऊन सज्ज असलेल्या या ग्रुपमधील गिर्यारोहक हे सातत्याने  विविध गड-किल्ल्यांवर चढाई करतात. आमळी गडावरील अवघड अशी कडा सर करण्यासाठी दोरीची आवश्यकता भासते. सुरक्षेच्या कारणास्तव या कडावर दोरी ठोकण्यासाठी या समूहातील तिघे पुढे जात असताना हेमेंद्र सुरेश अधटराव (२७,रा.बोरिवली, मुंबई) या तरुण गिर्यारोहकाचा अचानकपणे पाय घसरल्याने ते शेकडो फूट खोल दरीत कोसळले. डोक्याला गंभीर मार लागल्याने हेमेंद्र यांचा मृत्यू झाला. हेमेंद्र हे पुण्यात  राहत होते. त्यांच्या पश्चात आई, वडील, बहीण, असा परिवार आहे. हेमेंद्र यांचा अचानकपणे पाय घसरल्याने त्यांचा दरीत तोल गेला. हेमेंद्र हे तरबेज गिर्यारोहक होते अनावधानाने त्यांचा पाय ज्या दगडावर पडला तो दगड निखळल्याने दुर्दैवी अपघात घडल्याचे सचिव अनिकेत रहाळकर यांनी सांगितले.‘वैनतेय’ गावक-यांची धाव‘चक्रम’च्या गिर्यारोहकांनी घटना स्थानिक वैनतेय गिरीभ्रमण संस्थेला कळविली. वैनतेयचे पथक सर्व आवश्यक साधनसामुग्री घेऊन वाडीव-हेच्या दिशेने रवाना झाले. ‘चक्रम’चे पथक गडावरील वरच्या बाजूने हेमेंद्र यांचा शोध घेत होते, तर वैनतेयचे दाखल झालेले पथक पायथ्याला दरीमध्ये शोध घेत होते. दरम्यान, गावकरीही मदतीसाठी धावले. ‘चक्रम’च्या पथकाला हेमेंद्र हे जखमी अवस्थेत सापडले. त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने रक्तस्त्राव अधिक झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.

टॅग्स :NashikनाशिकFortगड