शहरं
Join us  
Trending Stories
1
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
2
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
3
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
4
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
5
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

चक्काजाम : नाशिक जिल्ह्यात १२ हजारहून अधिक मालवाहू वाहनांची चाके थांबली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2018 4:29 PM

देशात वाढत चाललेली असहनीय डिझेल दरवाढ, न परवडणारी आणि असहनीय टोल आकारणी, तृतीय पक्ष विमामध्ये न परवडणारी असहनीय आणि अपारदर्शक वाढ, ट्रान्सपोर्ट व्यवसायाला टीडीएस आकारणी आणि व न परवडणारी ई वे बिल प्रणाली यातून शासनाने दिलासा द्यावा. या प्रमुख मागण्यासाठी देशभर आॅल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेसकडून शुक्रवारपासून (दि.२०)देशभरात  तीव्र स्वरूपात चक्काजाम आंदोलनाला सुरुवात झाली आहे. या आंदोलनाला नाशिक जिल्ह्यातील ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद  दिल्याने जिल्हाभरात सुमारे १२ हजारहून अधिक मालवाहतूक करण्याऱ्या वाहणांची चाके थांबली आहे. 

ठळक मुद्देनाशिकमध्ये वाहतूकदारांच्या संपाला प्रतिसाद१२ हजारहून अधिक वाहनांची चाके थांबली

नाशिक : देशात वाढत चाललेली असहनीय डिझेल दरवाढ, न परवडणारी आणि असहनीय टोल आकारणी, तृतीय पक्ष विमामध्ये न परवडणारी असहनीय आणि अपारदर्शक वाढ, ट्रान्सपोर्ट व्यवसायाला टीडीएस आकारणी आणि व न परवडणारी ई वे बिल प्रणाली यातून शासनाने दिलासा द्यावा. या प्रमुख मागण्यासाठी देशभर आॅल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेसकडून शुक्रवारपासून (दि.२०)देशभरात  तीव्र स्वरूपात चक्काजाम आंदोलनाला सुरुवात झाली आहे. या आंदोलनाला नाशिक जिल्ह्यातील ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद  दिल्याने जिल्हाभरात सुमारे १२ हजारहून अधिक मालवाहतूक करण्याऱ्या वाहणांची चाके थांबली आहे. जिल्हाभरात १५०० हून अधिक ट्रान्सपोर्ट व्यावसायिक या संपात सहभागी झाले असून  या आंदोलनासाठी निमा, आयमा, महाराष्ट्र चेंबर्स आॅफ कॉमर्स व अवजड वाहतूक सेना यासह विविध संघटनांनीही पाठींबा दर्शविला आहे. त्यामुळे सरकारने डिझेलच्या किंमती जीएसटीच्या कक्षेत आणान्याची तसेच यावरील अधिभार कमी करणे, तसेच देशभरात डीझेलचे दर हे एकसमान असावे, त्याचबरोबर न परवडणारी आणि असहनीय टोल आकारणी, तृतीय पक्ष विमामध्ये न परवडणारी असहनीय आणि अपारदर्शक वाढ, ट्रान्सपोर्ट व्यवसायाला टीडीएस आकारणी आणि व न परवडणारी ई वे बिल प्रणाली यातून शासनाने दिलासा देण्याची मागणी मालवाहतूक दारांनी केली आहे. या सर्व मागण्या पूर्ण होईपर्यंत ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांकडून गांधीगिरी पद्धतीने बेमुदत आंदोलन सुरूच राहील. तसेच नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या सलग्न असलेले व्यावसायिकांचा एकही ट्रकमधून कुठल्याही मालाची वाहतूक करणार नसल्याची माहिती नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष जयपाल शर्मा व वरिष्ठ उपाध्यक्ष राजेंद्र फड, माजी अध्यक्ष अंजू सिंगल, नाशिक गुड्स ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष मोतीलाल चंदा, चेअरमन एम.पी.मित्तल यांनी दिली आहे. माल वाहतूकदारांच्या या देशव्यापी संपात नाशिक जिल्ह्यातून नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशन, नाशिक अवजड वाहतूक सेना, नाशिक गुड्स ट्रान्सपोर्ट असोसिएशनसारख्या संघटनांनी सहभाग घेतला असून येत्या दोन दिवसात प्रवासी वाहतूक दार आणि पुढील तीन चे चार दिवसात विद्यार्थ्यांची वाहतूक करणारे स्कूल बस वाहतूकदारही सहभागी होणार असल्याची माहिती आॅल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेसकडून देण्यात आली आहे. 

चालकांसाठी भोजनाची सेवा देशभरात मध्यरात्रीपासून सुरु झालेल्या या संपामुळे ट्रक चालकांनी आपल्या मालाची वाहतूक पूर्णपणे थांबविली आहे. त्यांच्यासाठी आडगाव ट्रक टर्मिनल, विल्होळी ट्रक टर्मिनल व चेहडी नाका येथे गाड्या उभ्या करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. आडगाव ट्रक टर्मिनल येथे ट्रक चालकांसाठी भोजनाची सेवा करण्यात आली आहे. जो पर्यंत हे आंदोलन सुरु राहील तो पर्यंत ट्रक चालकांना नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनकडून भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील इतर ठिकाणी नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या सलग्न असलेल्या व्यावसायिकांकडून ट्रक चालकांची व्यवस्था करण्यात आली असल्याचे नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनतर्फे सागण्यात आले आहे. 

माल वाहतूकदारांच्या विविध मागण्यांसाठी गांधीगिरी पद्धतीने आंदोलन सुरु आहे. यासाठी कोणीही रस्त्यावर उतरणार नाही. केवळ मागण्या मान्य होईपर्यंत मालवाहतूक पूर्णपणे थांबविण्यात आली आहे. या आंदोलन काळात कुठलाही माल ट्रकमध्ये लोड केला जाणार नाही. ट्रक चालकांनी आपली वाहने रस्त्याच्या कडेला न उभी करता ती आडगावसह इतर ट्रक टर्मिनलच्या जागेत लावावी.-जयपाल शर्मा, अध्यक्ष. नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशन.

 

टॅग्स :agitationआंदोलनNashikनाशिक