शालिमारला युवकावर चाकूहल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 00:55 IST2018-11-17T00:54:43+5:302018-11-17T00:55:00+5:30
शालिमार परिसरातील एका खाद्यपदार्थ विक्रीच्या गाड्यावर न्याहारी करीत असलेल्या युवकावर पंचशीलनगरमधील दोघा संशयितांनी चाकूहल्ला केल्याची घटना गुरुवारी (दि़१६) सायंकाळी घडली़

शालिमारला युवकावर चाकूहल्ला
नाशिक : शालिमार परिसरातील एका खाद्यपदार्थ विक्रीच्या गाड्यावर न्याहारी करीत असलेल्या युवकावर पंचशीलनगरमधील दोघा संशयितांनी चाकूहल्ला केल्याची घटना गुरुवारी (दि़१६) सायंकाळी घडली़ गुलाम जहागिर अन्सारी (२२, रा. बजरंगवाडी) असे चाकूहल्ल्यात जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे़ अन्सारी गाड्यावर नास्टा करीत होता़ यावेळी संशयित सोहेल शेख (रा.पंचशीलनगर) हा त्याच्या साथीदारासह तिथे आला़ त्यांनी मागील भांडणाची कुरापत काढून अन्सारी याच्या मानेवर चाकूने वार केले, तर त्याच्या साथीदाराने लाकडी दांडक्याने मारहाण केली़ याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.