फळे, भाजीपाला सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी लहाने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2018 00:37 IST2018-04-08T00:37:07+5:302018-04-08T00:37:07+5:30

नायगाव : येथील क्वालिटी फळे व भाजीपाला सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी विलास राजाराम लहाने यांची, तर उपाध्यक्षपदी निवृत्ती फकिरा बर्डे यांची बिनविरोध करण्यात आली.

As Chairman of Fruit and Vegetable Co-operative Society | फळे, भाजीपाला सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी लहाने

फळे, भाजीपाला सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी लहाने

नायगाव : येथील क्वालिटी फळे व भाजीपाला सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी विलास राजाराम लहाने यांची, तर उपाध्यक्षपदी निवृत्ती फकिरा बर्डे यांची बिनविरोध करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी एस. बी. कासार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत अध्यक्षपदासाठी लहाने यांचा तर उपाध्यक्षपदासाठी बर्डे यांचे एकेक उमेवारी अर्ज आल्याने बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. बैठकीस संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण सांगळे, डॉ. राजाराम चव्हाण, अशोक लोहकरे, अंबादास सांगळे, दिलीप पवार, पुंजा पवार, विष्णू कापडी, शांताराम गिते, दत्तात्रेय गरकळ, मनीषा सानप, पुष्पा गरकळ, कारभारी जेजुरकर, संतू पानसरे, रामदास बोडके, पांडुरंग बोडके, दिनेश बोडके आदी संचालक उपस्थित होते. यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा संस्थेच्या वतीने लक्ष्मण सांगळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. व्यवस्थापक बी. डी. घुमरे व द्रौपदी अहेर यांनी सहायक म्हणून काम पाहिले.

Web Title: As Chairman of Fruit and Vegetable Co-operative Society

टॅग्स :fruitsफळे