जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे आझाद मैदानावर उद्या धरणे
By Admin | Updated: March 24, 2015 00:02 IST2015-03-24T00:02:41+5:302015-03-24T00:02:52+5:30
जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे आझाद मैदानावर उद्या धरणे

जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे आझाद मैदानावर उद्या धरणे
नाशिक : राज्य शासन व जिल्हा परिषद सेवेतील कर्मचारी व अधिकारी यांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मुंबईत येत्या २५ मार्च रोजी आझाद मैदानावर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियनचे कार्याध्यक्ष विजयकुमार हळदे यांनी
दिली.
अनुकंपा कर्मचारी भरतीचे १० टक्के प्रमाण रद्दकरून पूर्वीप्रमाणेच अनुकंपा नोकर भरती करण्यात यावी, सर्व क्षेत्रातील प्रशिक्षित तांत्रिक मनुष्य बळाची सेवा भरती / स्वंयरोजगार वाढीसाठी कायदेशीर संरक्षणासह अर्थसहाय्य उपलब्ध करावे, १ जुलै २०१४ पासून वाढीव महागाई भत्त्याची थकबाकी त्वरित अदा करावी, केंद्र शासनाप्रमाणे ७ व्या वेतन आयोग शिफारशी अंमलात आणण्यासाठी सन २०१५-१६च्या महाराष्ट्र राज्याच्या अंदाजपत्रकात वित्तीय तरतूद करावी यासह विविध प्रकारच्या बारा मागण्यांसाठी हे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. या निवेदनावर जिल्हाध्यक्ष मामा डोंगरे, संजय पूरकर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. (प्रतिनिधी)