शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

कांदा, द्राक्ष उत्पादकांसाठी केंद्राचे झुकते माप: PM मोदी, ‘ऑपरेशन ग्रीन’ पुन्हा राबविणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2024 06:17 IST

‘ऑपरेशन ग्रीन’अंतर्गत कांदा वाहतुकीवर सबसिडी देण्याचे मिशन पुन्हा सुरू केले जाणार असून, क्लस्टर विकास आराखड्याचाही द्राक्ष पिकाला फायदा होईल, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. 

लोकमत न्यूज नेटवर्क, पिंपळगाव बसवंत (नाशिक) : ‘ऑपरेशन ग्रीन’अंतर्गत कांदा वाहतुकीवर सबसिडी देण्याचे मिशन पुन्हा सुरू केले जाणार असून, क्लस्टर विकास आराखड्याचाही द्राक्ष पिकाला फायदा होईल, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी केले. 

दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार व केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार तसेच नाशिक मतदारसंघातील हेमंत गोडसे यांच्या प्रचारार्थ पिंपळगाव बसवंत येथे आयोजित जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेससह राज्यातील महाविकास आघाडीवरही टीकास्त्र सोडले. 

कांदा प्रश्नाविषयी भूमिका मांडताना मोदी यांनी सांगितले, की गेल्या हंगामात सरकारने ७ लाख मेट्रिक टन कांदा खरेदी केला होता. यंदा ५ लाख मेट्रिक टन कांद्याचा बफर स्टॉक करण्याची प्रकिया सुरू झाली आहे. दहा दिवसांपूर्वीच कांद्यावरील निर्यातबंदी उठविण्यात आली आहे. गेल्या दहा वर्षांत कांदा निर्यातीत ३५ टक्के इतकी वाढ झालेली आहे तर निर्यात बंदी उठविल्यानंतर गेल्या दिवसात २२ हजार मेट्रिक टन पेक्षा निर्यात झालेली आहे. 

आम्हाला बळ द्या...

मोदी सरकारने नेहमीच शेतकरी हिताला प्राधान्यक्रम दिलेला आहे. सरकारने पहिल्यांदाच कांद्याचा बफर स्टॉक बनविण्याची व्यवस्था उभी केली. यापूर्वीच्या सरकारमध्ये अशी व्यवस्था नव्हती, असे सांगत मोदी यांनी सामान्यांसाठी सरकार राबवत असलेल्या प्रयत्नांना बळ देण्याचे आवाहन केले. तत्पूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे शेतकरी टोपी व गमछा देऊन स्वागत करण्यात आले.  यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ तसेच पालकमंत्री दादा भुसे यांनीही मनोगत व्यक्त करत विरोधकांचा समाचार घेतला.

 

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाMahayutiमहायुती