जळगाव नेऊर येथे गेल्या चाळीस वर्षांपासून चहाचा व्यवसाय करीत असलेले शांताराम शिंदे आणि नाना शिंदे हे गेली अनेक दिवसांपासून स्मशानभूमीमध्ये अंत्यविधीसाठी व रक्षा विसर्जनासाठी आलेल्या नागरिकांना हात-पाय धुण्यासाठी पाणी ठेवून, ऊन-पावसात प्रत्येकाच्या हातावर पाणी टाकून व कडुनिंबाचा पाला देऊन प्रत्येकाच्या दुःखात सहभागी होऊन एक आगळीवेगळी सेवा करीत आहेत. विशेष म्हणजे येथील सार्वजनिक विहिरीवरून अंत्यविधीप्रसंगी रात्री-बेरात्री पाणी ओढून आणत त्यांची सेवा अखंड सुरू आहे. ग्रामीण, तसेच शहरी भागांमध्ये अंत्यविधी किंवा रक्षा विसर्जनानंतर अनेक नागरिक हात-पाय धुतल्याशिवाय घरात प्रवेश करीत नाहीत. विशेष म्हणजे गेल्या दोन वर्षांपासून कोरोनासारख्या महामारीतही शिंदे पिता-पुत्रांनी आपली सेवा सुरूच ठेवली होती. दुष्काळासारख्या परिस्थितीत पाण्याची कमतरता असतानाही सार्वजनिक विहिरीवरून पाणी आणत सेवा करीत आहेत.
शिंदे पिता-पुत्र गेली अनेक वर्षांपासून आपली सेवा करीत असून, अंत्यसंस्कारानंतर केले जाणार सोपस्कर करण्याचे काम ते करतात. याच बरोबर आपला चहाचा व्यवसाय सांभाळून खंडेराव महाराज मंदिराचे सेवेकरी म्हणूनही कार्यरत असून, अनेक वर्षांपासून समाजसेवेचे व्रत घेतलेले शिंदे पिता-पुत्र परिसरात चर्चेचा विषय ठरत आहेत.
इन्फो
गरिबांसाठी मदतीचा हात
धार्मिक, सामाजिक कार्यात नेहमीच पुढाकार घेणारे शिंदे पिता-पुत्र गरीब होतकरूंसाठी मसिहा ठरत आहेत, तर चहाच्या टपरीवर येणारे पादचारी, भिकारी, तसेच शुक्रवार आणि मंगळवार येथे डोळे तपासणीचे शिबिर घेतले जाते. या शिबिरासाठी आलेल्या अंध व ज्येष्ठ नागरिकांना पाणी व चहा मोफत उपलब्ध करून देतात, त्यामुळे त्यांना नेत्रमित्र पुरस्कारही मिळाला आहे. समाजाप्रती आपणही काही देणे लागतो असे शांताराम बापू शिंदे व नाना शिंदे यांचे मत आहे.
फोटो- १८ शिंदे स्टोरी
चहाचा व्यवसाय सांभाळताना शांताराम शिंदे व नाना शिंदे.
180921\18nsk_10_18092021_13.jpg
फोटो- १८ शिंदे स्टोरी