जिल्ह्यात समाजदिन उत्साहात साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2020 00:36 IST2020-08-20T22:12:51+5:302020-08-21T00:36:12+5:30

मविप्र संचलित जनता इंग्लिश स्कूल व अभिनव बालविकास मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने सायखेडा येथे कर्मवीर रावसाहेब थोरात यांची जयंती समाजदिन म्हणून साजरा करण्यात आली.

Celebrating Samajdin in the district | जिल्ह्यात समाजदिन उत्साहात साजरा

जिल्ह्यात समाजदिन उत्साहात साजरा

सायखेडा : मविप्र संचलित जनता इंग्लिश स्कूल व अभिनव बालविकास मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने सायखेडा येथे कर्मवीर रावसाहेब थोरात यांची जयंती समाजदिन म्हणून साजरा करण्यात आली.
यावेळी ध्वजारोहण निफाड तालुका संचालक प्रल्हाद गडाख यांच्या हस्ते करण्यात आले. कर्मवीरांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्य सुरेश कमानकर होते.
प्रास्ताविक प्राचार्य मनीषा खैरनार यांनी केले. शरद वाणी यांनी कर्मवीरांविषयी माहिती सांगितली. शिक्षक पद्माकर पंगे, विष्णू डेर्ले, घनश्याम जोंधळे यांनी विविध स्वरूपात विद्यालयास देणगी दिल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन अवधूत आवारे यांनी तर आभार अशोक टर्ले यांनी मानले.
कार्यक्रमास दिलीप शिंदे, चंद्रकांत गावले, प्रभाकर रायते, रामा कुटे, मुख्याध्यापक नयना राजोळे, उपमुख्याध्यापक पी. एस. कापडणीस, पर्यवेक्षक जी. जी. जाधव, प्रा. घरटे, प्रा. मुरकुटे, प्रा. जगताप, प्रा. कांडेकर आदी उपस्थित होते.

Web Title: Celebrating Samajdin in the district