आव्हाटीत जागतिक व्याघ्रदिन साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2021 05:30 PM2021-08-04T17:30:54+5:302021-08-04T17:32:21+5:30

कंधाणे : बागलाण तालुक्यातील आव्हाटी येथे जागतिक व्याघ्र दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

Celebrate World Tiger Day | आव्हाटीत जागतिक व्याघ्रदिन साजरा

आव्हाटीत जागतिक व्याघ्रदिन साजरा

googlenewsNext
ठळक मुद्देस्थानिक गावकऱ्यांमध्ये जनजागृती करणे, पर्यावरणातील वाघाचे स्थान आणि भुमिका याबद्दल वन कर्मचारी, नागरीक यांना माहिती दिली.

कंधाणे : बागलाण तालुक्यातील आव्हाटी येथे जागतिक व्याघ्र दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

या दिनानिमित्त वाघांचे निसर्गातील महत्व व याबाबत स्थानिक गावकऱ्यांमध्ये जनजागृती करणे, पर्यावरणातील वाघाचे स्थान आणि भुमिका याबद्दल वन कर्मचारी, नागरीक यांना माहिती वाइल्ड लाईफ वॉर्डन नाशिक जिल्हा सदस्य अमित खरे यांनी दिली. अध्यक्षस्थानी वनसमिती अध्यक्ष शांताराम भामरे होते.

मांसाहारी असलेला हा प्राणी जंगलातील इतर तृणभक्षक प्राण्यांची शिकार करून निसर्ग चक्राचा समतोल राखण्यास मदत करतो. जर या तृण भक्षक प्राण्यांवर नियंत्रण न ठेवल्यास त्यामुळे सर्व जंगल नष्ट होऊ शकते.
वाघाला ढाण्या वाघ असेही संबोधले जाते. जगाच्या एकुण वाघांच्या ५० टक्क्यांपेक्षा अधिक वाघ एकट्या भारतात असुन त्यातल्या त्यात हे सर्व वाघ महाराष्ट्रात आहेत असे मत निसर्ग आणि प्राणी मित्र राकेश घोडे यांनी सांगितले.

यावेळी सटाणा वनपरिक्षेत्र अधिकारी वैभव हिरे, संदिप सोनवणे, सरपंच शांताराम भामरे, पोलीस पाटील भिका भामरे, उपसरपंच ताराबाई भामरे, दिलीप भामरे, गोकुळ भामरे, सुरेश भामरे, युवराज भामरे, वामन भामरे, अक्षय भामरे, निखिल भामरे आदी उपस्थित होते.

 

Web Title: Celebrate World Tiger Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.