उत्सव उत्साहात व्हावा; जाचक नियम नको !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2018 01:21 AM2018-07-31T01:21:28+5:302018-07-31T01:21:44+5:30

आगामी गणेशोत्सव शहरात सार्वजनिकरित्या उत्साहात साजरा व्हावा आणि या उत्सवातून शहरवासियांचे प्रबोधन घडावे, यासाठी सरकारी यंत्रणेने सार्वजनिक मंडळांना प्रोत्साहित करुन त्यांना सहकार्य करण्याची गरज असल्याचा सूर विविध मंडळांच्या पदाधिकाऱ्यांमधून उमटला.

Celebrate the festival; Do not junk rules! | उत्सव उत्साहात व्हावा; जाचक नियम नको !

उत्सव उत्साहात व्हावा; जाचक नियम नको !

googlenewsNext

नाशिक : आगामी गणेशोत्सव शहरात सार्वजनिकरित्या उत्साहात साजरा व्हावा आणि या उत्सवातून शहरवासियांचे प्रबोधन घडावे, यासाठी सरकारी यंत्रणेने सार्वजनिक मंडळांना प्रोत्साहित करुन त्यांना सहकार्य करण्याची गरज असल्याचा सूर विविध मंडळांच्या पदाधिकाऱ्यांमधून उमटला. ‘लोकमत’ने गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर काही मंडळांच्या पदाधिकाºयांशी संवाद साधत त्यांना भेडसावणाºया सरकारी अडीअडचणी आणि नियम, अटी, शर्तींचा जाच याबाबत जाणून घेण्याचा प्रयत्न केला.  यावेळी सर्वांनी उत्सव उत्साहात पार पाडण्यासाठी प्रशासकिय यंत्रणेनेने पुढाकार घेत गणेश मंडळांना विश्वासात घेऊन सहकार्य करण्याची अपेक्षा व्यक्त केली. एक खिडकी योजना, परवानगी शुल्कात कपात, देणगीदारांच्या जाहिराती करमुक्त कराव्या अशा विविध मागण्या केल्या.  दहा दिवसांचा गणपती उत्सव आहे. प्रशासनाने भावनांशी खेळ करू नये. परवानग्या देण्यासाठी एक खिडकी योजना मुंबई, पुणेच्या धर्तीवर राबवावी. प्रशासनाने अडथळा निर्माण करू नये. सण-उत्सव आता सुरू होणार आहे. सार्वजनिक स्वच्छताही महापालिकेची जबाबदारी आहे. ती पार पाडावी. युवक मित्रमंडळ मागील अनेक वर्षांपासून सार्वजनिकरीत्या मुंबईनाका येथे गणेशोत्सव साजरा करत आहे.  - प्रथमेश गिते, उपमहापौर
दंडे हनुमान मित्रमंडळ हे जुने नाशिक परिसरातील जुन्या मंडळांपैकी रस्त्याच्या कायद्याच्या चौकटीत अडकविण्याचा प्रयत्न करू नये, विनातक्रारी मंडळांवर कारवाई करू नये. रस्त्यांच्या परवानगीचे शुल्क कमी करावे. सार्वजनिक उत्सव साजरा करण्याचा प्रयत्न सामूहिकरीत्या केला जात असल्याने सवलतीचे दर असावे. मोठे मंडळ, लहान मंडळ असा भेद करूनये, परवानगी शुल्काची रक्कम समान ठेवावी.  - गजानन शेलार, संस्थापक अध्यक्ष
भगवती शैक्षणिक, सामजिक कला, क्रीडा मंडळाच्या वतीने मागील अनेक वर्षांपासून सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जात आहे. आकर्षक देखावे पंचवटीमध्ये साकारले जातात. या भागात असलेले प्रसाधनगृह तरी स्वच्छ करावेत रस्त्यावरील खड्डे बुजवावे तसेच तात्पुरत्या स्वरूपात जादा स्वच्छतागृह याशिवाय गणेशोत्सव स्थापनेसाठी तसेच मंडप उभारणी प्रशासनाच्या परवानग्या घ्याव्या लागतात या कालावधीसाठी कार्यकर्त्यांची धावपळ होते. उत्सव कालावधीत मंडळांची गैरसोय होऊ नये, यासाठी सर्व परवानग्या एकाच ठिकाणी मिळतील अशी व्यवस्था केली पाहिजे.
- अनिल वाघ, अध्यक्ष
नवीन आडगावनाका सांस्कृतिक कला, क्रीडा मंडळ मागील अनेक वर्षांपासून सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करत आहे. महापालिकेकडून गणेशोत्सवात विशेष कुठल्याही सुविधा दिल्या जात नाहीत. प्रशासनाने या कालावधीत परिसर स्वच्छ कसा राहील याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. गणेशोत्सव मंडळांना देणगीदार देणगीची रक्कम देतात त्याबदल्यात मंडळी देणगीदारांच्या जाहिरातीचे फलक लावतात, मात्र प्रशासन यावर करआकारणी करते, ती करआकारणी थांबवावी तसेच विविध परवान्यांसाठी मंडळाच्या कार्यकर्त्यांची दमछाक होत असल्याने प्रशासनाने एका छताखाली सर्व परवानग्या उपलब्ध करून देण्याची सुविधा द्यावी. ज्या जागेवर गणेश देखावे साकारले जातात ती जागा कायम करावी.
- समाधान जाधव, अध्यक्ष

Web Title: Celebrate the festival; Do not junk rules!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.