ब्लाइन्ड वेल्फेअरतर्फे दिवाळी साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2019 00:25 IST2019-10-31T00:24:21+5:302019-10-31T00:25:50+5:30

दि ब्लाइंड वेल्फेअर आॅर्गनायझेशन व लायन्स क्लब कॉर्पोरेट यांच्या संयुक्त विद्यमाने लायन्स क्लब हॉल येथे दिवाळी उत्सव व विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात गरजू अंध बांधवांना एक किलो मिठाई व कपड्यांचे वितरण करण्यात आले

 Celebrate Diwali with Blind Welfare | ब्लाइन्ड वेल्फेअरतर्फे दिवाळी साजरी

ब्लाइन्ड वेल्फेअरतर्फे दिवाळी साजरी

नाशिक : दि ब्लाइंड वेल्फेअर आॅर्गनायझेशन व लायन्स क्लब कॉर्पोरेट यांच्या संयुक्त विद्यमाने लायन्स क्लब हॉल येथे दिवाळी उत्सव व विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात गरजू अंध बांधवांना एक किलो मिठाई व कपड्यांचे वितरण करण्यात आले
कार्यक्र मात आदित्य भागवत, नेहा म्हस्के, राजू गांगुर्डे, पाडेवार वैष्णवी, दत्तू कोºहाळे, राजू कोठावदे, अर्चना सिंग, रुक्मिणी बडसल आणि पुष्पा शेवरे या अंध व्यक्तींना महिनाभराचे रेशन वाटप करण्यात आले. नामदेव ह्याळीज व राजू गांगुर्डे या दोन अंध व्यक्तींचे कायमचे पुनर्वसन व्हावे म्हणून स्टॉल राहुल शहा व मुकुंद कुरभट्टी यांनी प्रत्येकी वीस हजार रु पयांची मदत स्टॉलसाठी केली. कपड्यांकरिता संस्थेचे अर्जुन मुद्दा व अनिल नहार यांनी मदत केली, तर दहा अंध विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले.
कार्यक्र मास प्रमुख पाहुणे म्हणून महिंद्रा लॉजिस्टिक मुख्य अधिकारी निंबा भामरे व प्रसाद नाईक, लायन्स क्लब कॉर्पोरेट अध्यक्ष राजू व्यास, सुनील पाटील उपस्थित होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष अरु ण भारस्कर यांनी संस्थेच्या उपक्र मांची माहिती दिली. पाहुण्यांचे स्वागत व परिचय मानद अध्यक्ष कल्पना पांडे यांनी केले, आभार प्रदर्शन कोषाध्यक्ष विजया दबे यांनी केले.

Web Title:  Celebrate Diwali with Blind Welfare

टॅग्स :Nashikनाशिक