महर्षी वाल्मीकी जयंती साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2019 00:56 IST2019-10-14T22:45:51+5:302019-10-15T00:56:38+5:30
नाशिकरोड परिसरात विविध ठिकाणी भगवान महर्षी वाल्मीकी जयंतीनिमित्त प्रतिमापूजन करून अभिवादन करण्यात आले.

नाशिकरोड देवळालीगाव येथे भगवान महर्षी वाल्मीकी जयंतीनिमित्त शोभायात्रा शुभारंगप्रसंगी महेश कुमार ढकोलिया, राहुल चटोले, अरु ण गिरजे आदी.
नाशिकरोड : परिसरात विविध ठिकाणी भगवान महर्षी वाल्मीकी जयंतीनिमित्त प्रतिमापूजन करून अभिवादन करण्यात आले.
भगवान महर्षी वाल्मीकी जयंतीनिमित्त देवळालीगाव, गांधीधाम, सुभाषरोड, जयभवानीरोड, बिटको चौक, शिवाजी पुतळा, गोरेवाडी, जेलरोड, उपनगर आदी भागांमध्ये व्यासपीठ उभारून मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. देवळालीगाव अखिल भारतीय श्री वाल्मीकी नवयुवक संघातर्फे रविवारी सायंकाळी देवळालीगावातून ढोलांच्या गजरात शोभायात्रा काढण्यात आली होती. मेहतर समाजबांधव, नागरिक, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मेघवाळ मेहतर वाल्मीकी समाज संघर्ष समितीतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलनी, संत वीर मेघ, माया चौक, रेडक्र ॉस येथे महर्षी वाल्मीकी ऋषी जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष सुरेश मारू व वैशाली भोसले व यांच्या हस्ते महर्षी वाल्मीकी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी वाल्मीकी ऋषींचे कार्य व योगदानाबाबत सर्व समाजबांधवांना माहिती देण्यात आली. याप्रसंगी श्रीकांत बाबरिया, जितू मारू, आनंद चव्हाण, जयसिंग मकवाना, अशोक गोहील, मनोज सोलंकी, भावेश पडाया, संजय बाबरिया, हरिश मारू, सागर बाबरिया, गणेश परमार, नीलेश धारिया, चेतन मारू, हर्षद पडाया आदींसह अधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.