शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
4
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
5
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
6
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
7
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
8
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
9
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
10
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
11
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
12
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
13
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
14
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
15
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
16
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
17
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
18
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
19
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
20
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
Daily Top 2Weekly Top 5

प्रभाग ५३ वर सीसीटीव्हीचा ‘वॉच’

By admin | Updated: January 8, 2016 00:25 IST

प्रभाग ५३ वर सीसीटीव्हीचा ‘वॉच’

इंदिरानगर : महापालिका हद्दीतील एकूण प्रभागांपैकी शहरातील इंदिरानगर भागातील प्रभाग ५३ हा संपूर्णपणे सीसीटीव्हीच्या ‘वॉच’खाली आला आहे. या प्रभागातील सर्वच मुख्य चौकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आल्याने सध्या एकूण चौदा कॅमेऱ्यांची प्रभागातील हालचालींवर सूक्ष्म नजर आहे. नुकतेचे चेतनानगर परिसरातील लालबाग चौकात बसविण्यात आलेल्या कॅमेऱ्यांचे उद्घाटन आमदार सीमा हिरे यांच्या हस्ते करण्यात आले.इंदिरानगर, राजीवनगर, चेतनानगर हा परिसर सुशिक्षित नागरिकांची वसाहत म्हणून ओळखला जातो. या भागात ज्येष्ठ नागरिकांची संख्यादेखील लक्षणीय आहे. दिवसेंदिवस या भागात शाळा, महाविद्यालये, खासगी क्लासेसची संख्यादेखील वाढीस लागत आहे. त्यामुळे इंदिरानगर भागातील सुरक्षिततेचा प्रश्नदेखील महत्त्वाचा असल्याची बाब लक्षात घेत नगरसेवक सतीश सोनवणे यांनी प्रभागाच्या सर्वच मुख्य चौकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयामुळे इंदिरानगर पोलीस ठाण्याला सर्वाधिक मदत झाली. कारण परिसरात घडणाऱ्या गुन्हेगारीच्या घटनांचा सुगावा लावण्यासाठी हे कॅ मेरे उपयुक्त ठरत आहेत. सोनवणे यांनी युनिक मित्रमंडळाच्या माध्यमातून सर्वप्रथम दोन वर्षांपूर्वी राजीवनगरच्या भगवती चौकामध्ये चार सीसीटीव्ही कॅमेरे बसविले. त्यानंतर चार्वाक चौक, गजानन महाराज मार्ग, सावरकर चौक ते पेठेनगर रस्ता, राणेनगर चौफुली या ठिकाणी कॅमेरे बसविले. बुधवारी (दि.६) पत्रकार दिनाच्या औचित्यावर नागरिकांच्या मागणीनुसार चेतनानगर परिसरातील लालबाग चौकातही चार कॅमेरे बसविण्यात आले असून त्याचा शुभारंभ सीमा हिरे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी प्रतिभा चौधरी, शोभा दोंदे, वसंत चिकोडे, किशोर शिरसाठ, अनिता सोनवणे, अनिल जाचक आदि उपस्थित होते. (वार्ताहर)