शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
4
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
5
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
6
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
7
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
8
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
9
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
10
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
11
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
12
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
13
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
14
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
15
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
16
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
17
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
18
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
19
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
20
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
Daily Top 2Weekly Top 5

सीसीटीव्हीमुळे सराईत गुन्हेगार इराणी झाला जेरबंद

By admin | Updated: January 25, 2016 23:24 IST

सीसीटीव्हीमुळे सराईत गुन्हेगार इराणी झाला जेरबंद

इंदिरानगर : पोलीस असल्याची बतावणी करून वृद्ध नागरिकांसह महिलांची लूट, तसेच चेनस्रॅचिंग करणारा श्रीरामपूर येथील सराईत गुन्हेगार करम नूर अली इराणी यास इंदिरानगर पोलिसांनी सुमारे तीन दिवसांपूर्वी अटक केली़ या तोतयाचा शोध घेण्यास पोलिसांसाठी सर्वांत महत्त्वाचा दुवा ठरले ते इंदिरानगरमध्ये युनिक ग्रुपच्या वतीने लावण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे़ या कॅमेऱ्यांमुळेच या तोतया पोलिसास पकडण्यात यश आल्याची माहिती सहायक पोलीस आयुक्त अतुल झेंडे यांनी पत्रकार परिषदेत दिली़ तसेच यातील उर्वरित तीन फरार आरोपींचा शोध सुरू असल्याचे सांगितले़सुमारे चार महिन्यांपूर्वी इंदिरानगर परिसरातील अशोका स्कूल, भगवती चौक, महाराष्ट्र बँक व बापू बंगला परिसरात पोलीस असल्याची बतावणी करून चार वृद्ध नागरिकांची लूट करण्यात आली होती़ त्यामध्ये सोन्याची चेन व अंगठ्यांचा समावेश होता़ या घटनेमुळे परिसरातील ज्येष्ठ नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली होती़ संशयित करम नूर अली इराणी हा भगवती चौकात ज्येष्ठ नागरिकाची लूट करीत असल्याचे युनिक ग्रुपने लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले़या सीसीटीव्ही फुटेजवरून इंदिरानगर पोलीस इराणी व त्याच्या तिघा साथीदारांचा शोध घेत होते़ दरम्यान, पाच दिवसांपूर्वी श्रीरामपूरला सापळा रचून इराणी यास अटक करण्यात आली असून, त्याने शहर परिसरातील आठ गुन्ह्यांची कबुलीही दिली आहे़ तसेच त्याने लुटीचे सोने विकलेल्या सराफाकडून २५ तोळे सोनेही जप्त करण्यात आले आहे़ (प्रतिनिधी)