शिवडेच्या तलाठ्यास लाच घेताना पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 00:01 IST2021-02-22T22:32:26+5:302021-02-23T00:01:47+5:30
नाशिक : वारस म्हणून सात-बारा उताऱ्यावर नाव लावण्यासाठी शिवडे, ता. सिन्नर येथील तलाठी हरीश लासमन्ना ऐटवार यास १५०० रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे.

शिवडेच्या तलाठ्यास लाच घेताना पकडले
नाशिक : वारस म्हणून सात-बारा उताऱ्यावर नाव लावण्यासाठी शिवडे, ता. सिन्नर येथील तलाठी हरीश लासमन्ना ऐटवार यास १५०० रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे.
तक्रारदाराचे आजोबा मयत झाले असून, त्यांचे वारस म्हणून आई व मामाच्या नावाची नोंद सात-बारा उताऱ्यावर करण्यासाठी तलाठी हरीश ऐटवार यांनी तक्रारदाराकडे २००० रुपयांची लाच मागितली होती. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यानंतर पथकाने सापळा रचला. दरम्यान, ऐटवार यांनी तडजोडीअंती तक्रारदाराकडून लक्की टी स्टॉल, संगमनेर नाका, सिन्नर येथे तक्रारदाराकडून १५०० रुपयांची लाच स्वीकारली. यावेळी पथकाने त्यास रंगेहाथ पकडले. या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.