मांजरपाड्याचे पाणी कातरणी येथे पोहोचले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2019 01:40 IST2019-09-27T01:39:45+5:302019-09-27T01:40:15+5:30
पाटोदा : अर्ध्या शतकापासून पाण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या व येवला तालुक्याला वरदान ठरणाऱ्या मांजरपाड्याचे पाणी पुणेगाव-दरसवाडी पोहोच कालव्यास निर्मितीनंतर प्रथमच आवर्तन सोडण्यात आले. गुरुवारी (दि. २६) पहाटे ४ वाजता कातरणी शिवारात पाणी पोहोचताच स्वप्न प्रत्यक्षात साकार झाल्याने शेतकऱ्यांनी आनंदोत्सव साजरा केला, तर ग्रामस्थांनी जलपूजन केले.

मांजरपाडा प्रकल्पाचे पाणी येवला तालुक्यातील कातरणी शिवारात पोहोचल्यानंतर ग्रामस्थांनी जलपूजन करून जल्लोष केला. या प्रकल्पामुळे येवला तालुका सुजलाम् सुफलाम् होण्याची शक्यता वर्तविली जाते आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पाटोदा : अर्ध्या शतकापासून पाण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या व येवला तालुक्याला वरदान ठरणाऱ्या मांजरपाड्याचे पाणी पुणेगाव-दरसवाडी पोहोच कालव्यास निर्मितीनंतर प्रथमच आवर्तन सोडण्यात आले. गुरुवारी (दि. २६) पहाटे ४ वाजता कातरणी शिवारात पाणी पोहोचताच स्वप्न प्रत्यक्षात साकार झाल्याने शेतकऱ्यांनी आनंदोत्सव साजरा केला, तर ग्रामस्थांनी जलपूजन केले.
१९ सप्टेंबर रोजी रोजी दरसवाडी धरणातून येवला तालुक्यासाठी आवर्तन सोडण्यात आले असून, हे पाणी आठ दिवसांच्या प्रतीक्षेनंतर तीस किलोमीटरचे अंतर पार करीत चांदवड तालुक्यातील तळेगावरोही शिवारातून येवला तालुक्याच्या कातरणी शिवारात प्रवाहित झाले. चाळीस वर्षांपासून या पाट-पाण्यासाठी मोठा संघर्ष सुरू आहे. करंजवण संघर्ष समिती स्थापन करून कामासाठी पाठपुरावा केला. तसेच यासाठी सात दिवस तुरुंगवास भोगला. करंजवणचे पाणी देण्याचे बंद झाल्याने ओझरखेडचे पाणी देण्याचे आश्वासन मिळाले.