पूजा चव्हाण प्रकरणी जात पंचायत सक्रिय, अंनिसचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 01:05 IST2021-02-24T23:51:21+5:302021-02-25T01:05:33+5:30

नाशिक : पुणे येथील पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी सध्या वनमंत्री संजय राठोड यांचे नाव घेतले जात आहे. मात्र, या प्रकरणात आता बंजारा समाजाची जात पंचायतीचा हस्तक्षेप असल्याचा आरोप महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या जात पंचायत मूठमाती अभियानाने केला आहे.

Caste Panchayat active in Pooja Chavan case, alleges Annis | पूजा चव्हाण प्रकरणी जात पंचायत सक्रिय, अंनिसचा आरोप

पूजा चव्हाण प्रकरणी जात पंचायत सक्रिय, अंनिसचा आरोप

नाशिक : पुणे येथील पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी सध्या वनमंत्री संजय राठोड यांचे नाव घेतले जात आहे. मात्र, या प्रकरणात आता बंजारा समाजाची जात पंचायतीचा हस्तक्षेप असल्याचा आरोप महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या जात पंचायत मूठमाती अभियानाने केला आहे.

संस्थेचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील व राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे यांनी हा आरोप केला आहे. गायब झालेले वनमंत्री हे समाजाच्या ठिकाणी कसे काय पत्रकार परीषद घेऊ शकतात, न्याय व अन्याय ठरविण्याचा अधिकार त्यांचा नाही. त्यांच्या वर्तनाचा अभियानाच्या वतीने निषेध करण्यात आला.

Web Title: Caste Panchayat active in Pooja Chavan case, alleges Annis