शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
6
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
7
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
8
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
9
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
10
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
11
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
13
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
14
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
15
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
16
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
17
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
18
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
19
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
20
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
Daily Top 2Weekly Top 5

केशरी कार्डधारकांनाही मिळणार अन्नसुरक्षेचा लाभ

By admin | Updated: November 15, 2016 02:21 IST

शासनाचा निर्णय : २५ नोव्हेंबरपर्यंत लाभार्थी निश्चित

नाशिक : अन्नसुरक्षेचा लाभ देताना भेदभाव झाल्याचा सार्वत्रिक होणारा आरोप पाहता केंद्र सरकारने अत्यल्प उत्पन्न गट असलेल्या केशरी शिधापत्रिकाधारकांनाही अन्नसुरक्षा योजनेचा लाभ देण्याचा निर्णय घेतला असून, अंत्योदय योजनेची व्याप्तीही वाढविण्यात आली आहे. येत्या २५ नोव्हेंबरपर्यंत लाभार्थी निश्चित करून डिसेंबरपासून प्रत्यक्ष स्वस्त दरात धान्याचे वाटप केले जाणार आहे. शासनाच्या या निर्णयाने नाशिक शहरातील एक लाख २१ हजार नागरिकांना नव्याने अन्नसुरक्षा योजनेत सामावून घेतले जाणार असून, अंत्योदय योजनेतही सुमारे दोन हजार नागरिकांचा समावेश करण्यात येणार आहे. केंद्रातील आघाडी सरकारच्या काळात अन्नसुरक्षा योजनेची अंमलबजावणी करण्यात आली होती, त्यात ग्रामीण भागातील ४६ टक्के तर शहरी भागातील २८ टक्के जनतेचा अधिकाधिक समावेश करण्यात आला. मात्र यातील लाभार्थी ठरविताना वार्षिक उत्पन्न जरी विचारात घेतले गेले असले तरी, त्यात मोठ्या प्रमाणावर भेदभाव झाला होता. एकाच ठिकाणी व सारखेच उत्पन्न असतानाही एकाला या योजनेचा लाभ मिळाला व दुसऱ्याला डावलण्यात आल्याने यासंदर्भात नेहमीच तक्रारी केल्या जात होत्या. राजकीय पक्ष, झोपडपट्टीवासीयांनी वेळोवेळी शासन दरबारी पाठपुरावा केला होता. या सर्व गोष्टींची दखल घेत शासनाने अन्नसुरक्षा योजनेचा लाभ देणाऱ्यांच्या उद्दिष्टात वाढ केली आहे. त्यासाठी वार्षिक उत्पन्न ५९ हजाराच्या आत असलेल्या कुटुंबीयांना त्यात सामावून घेण्यात येणार असून, अंत्योदय योजनेतही अधिक कुटुंबाना संधी मिळणार आहे. सध्या दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना त्यात सहभागी करून घेतले जाईल. शासनाने यासाठी मुदत निश्चित केली असून, २५ नोव्हेंबरपर्यंत लाभेच्छुक निश्चित केले जातील. त्यासाठी प्रत्येक तालुक्यातून याद्या मागविण्यात आल्या आहेत. त्या याद्या तपासून नंतर त्यावर हरकती व सूचना मागविण्यात येतील व अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. त्यासाठी शहरातील रेशन दुकानदारांची शनिवारी धान्य वितरण अधिकाऱ्यांनी बैठक घेऊन लाभेच्छुकांच्या याद्या सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. (प्रतिनिधी)