प्रमोदनगरमधील घरफोडीत सहा लाखांची रोकड लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 22:02 IST2018-10-27T22:01:56+5:302018-10-27T22:02:17+5:30
नाशिक : कार्यालयाच्या खिडकीचे गज कापून चोरट्यांनी तिजोरीतील सुमारे सहा लाखांची रोकड चोरून नेल्याची घटना गंगापूर रोडवरील प्रमोदनगरमध्ये शुक्रवारी (दि़२६) घडली़

प्रमोदनगरमधील घरफोडीत सहा लाखांची रोकड लंपास
नाशिक : कार्यालयाच्या खिडकीचे गज कापून चोरट्यांनी तिजोरीतील सुमारे सहा लाखांची रोकड चोरून नेल्याची घटना गंगापूर रोडवरील प्रमोदनगरमध्ये शुक्रवारी (दि़२६) घडली़
विशाल रमेश अग्रवाल (रा. ऋषीराज हार्मोनी, गंगापूररोड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार हिंदुस्थान लिव्हर या नामांकित कंपनीचे ते वितरक असून, त्यांचे प्रमोदनगरमधील निर्मला कान्व्हेंट शाळेशेजारील अग्रवाल चेंबर्समध्ये कार्यालय आहे़ गुरुवारी (दि़२५) रात्री ते शुक्रवारी (दि़२६) सकाळच्या सुमारास चोरट्यांनी त्यांच्या पहिल्या मजल्यावरील कार्यालयाचे खिडकीचे गज कापून प्रवेश केला़ यानंतर तिजोरीत ठेवलेली सुमारे ५ लाख ९६ हजाराची रोकड चोरून नेली.
याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.