मद्याचे दुकान फोडून रोकड गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2020 00:10 IST2020-08-11T23:16:08+5:302020-08-12T00:10:41+5:30

नाशिक : मद्याचे दुकान फोडून चोेरट्यांनी एक लाख रुपयांची रोकड लंपास केल्याचा प्रकार दिंडोरीरोड परिसरात शनिवारी (दि. ८) मध्यरात्री घडली.

Cash disappears from liquor store | मद्याचे दुकान फोडून रोकड गायब

मद्याचे दुकान फोडून रोकड गायब

ठळक मुद्दे९५ हजार रुपयांची रोकड चोरट्यांनी हातोहात लंपास केल्याची घटना

नाशिक : मद्याचे दुकान फोडून चोेरट्यांनी एक लाख रुपयांची रोकड लंपास केल्याचा प्रकार दिंडोरीरोड परिसरात शनिवारी (दि. ८) मध्यरात्री घडली. याप्रकरणी किशोर बबन ठाकरे यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार त्यांचे म्हसरूळच्या हद्दीत दिंडोरीरोडवर समृद्धी अपार्टमेंट येथे दिंडोरी लिकर्स वाइन शॉप आहे. शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात संशयितांनी दुकानाचे लोखंडी ग्रील व शटर वाकवून आत प्रवेश
केला.
दुकानातील काउंटरच्या ड्रॉवरमध्ये ठेवलेली तसेच इतर ठिकाणी ठेवलेली एकूण ९५ हजार रुपयांची रोकड चोरट्यांनी हातोहात लंपास केल्याची घटना घडली. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

Web Title: Cash disappears from liquor store

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.