जातिवाचक शिवीगाळ प्रकरणी गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2018 00:57 IST2018-10-14T00:56:38+5:302018-10-14T00:57:38+5:30

पती त्रास देत असल्याने माहेरी निघून गेलेल्या पत्नीच्या नातेवाइकांना जातिवाचक शिवीगाळ करणारा पती सागर गजानन खिरकाडे (रा़ मेहेरधाम, पेठरोड) याच्या विरोधात म्हसरूळ पोलिसांनी अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे़

In the case of a supercritical case filed a complaint | जातिवाचक शिवीगाळ प्रकरणी गुन्हा दाखल

जातिवाचक शिवीगाळ प्रकरणी गुन्हा दाखल

नाशिक : पती त्रास देत असल्याने माहेरी निघून गेलेल्या पत्नीच्या नातेवाइकांना जातिवाचक शिवीगाळ करणारा पती सागर गजानन खिरकाडे (रा़ मेहेरधाम, पेठरोड) याच्या विरोधात म्हसरूळ पोलिसांनी अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे़
म्हसरूळ पोलीस ठाण्यात कविता भोये (रा. गावरान हॉटेलमागे, पेठरोड, पंचवटी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांच्या बहिणीचा संशयित सागर खिरकाडे यांच्याशी प्रेमविवाह झालेला आहे़
मात्र सततच्या त्रासास कंटाळून त्याची पत्नी माहेरी निघून गेली आहे़ ७ व ९ आॅक्टोबर २०१८ रोजी संशयित सागर हा कविता भोये यांच्या घरात घुसला व पत्नीबाबत विचारणा केली़ यावर सुभाष भोये यांनी माहीत नसल्याचे सांगितले. यानंतर संशयित सागरने पत्नी प्रतिभा कुठे आहे ते सांगा अथवा चार लाख रुपये द्या, असे म्हणून खंडणी मागितली.

यानंतर संशयिताने भोये दाम्पत्यास सार्वजनिक रोडवर अडवून जातिवाचक शिवीगाळ करीत त्यांच्या मुलीलाही शिवीगाळ करून तिघांनाही जिवे ठार मारण्याची धमकी देत अ‍ॅसिड फेकण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे़

Web Title: In the case of a supercritical case filed a complaint