फडणवीस यांची बदनामी करणाऱ्यांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 01:13 IST2021-05-03T01:12:18+5:302021-05-03T01:13:18+5:30

नाशिक शहरातील कोरोनास्थितीचा आढावा घेण्यासाठी आलेले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा बिटको रुग्णालयात व्हिडिओ काढून सोशल मीडियावर बदनामी केल्याप्रकरणी नाशिक पोलिसांनी पाचजणांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

A case has been registered against those who defamed Fadnavis | फडणवीस यांची बदनामी करणाऱ्यांवर गुन्हा दाखल

फडणवीस यांची बदनामी करणाऱ्यांवर गुन्हा दाखल

नाशिक : नाशिक शहरातील कोरोनास्थितीचा आढावा घेण्यासाठी आलेले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा बिटको रुग्णालयात व्हिडिओ काढून सोशल मीडियावर बदनामी केल्याप्रकरणी नाशिक पोलिसांनी पाचजणांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
 रूग्णालयांना ऑक्सिजन तसेच रेमडेसिविरचा पुरवठा होत नाही. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी (दि. ३०) नाशिकरोड येथील महापालिकेच्या नवीन बिटको रुग्णालयाला भेट देऊन रुग्णांच्या नातेवाइकांची  विचारपूस केली. बिटको रुग्णालयात ते पाहणी करत असताना, काहींनी त्यांचा व्हिडिओ काढून सोशल मीडियावर शिवराळ टिप्पणीसह तो व्हायरल केला. त्यामुळे भाजपचे नाशिकरोड येथील ब्लॉक अध्यक्ष हेमंत गायकवाड यांनी पोलिसांत तक्रार केली आहे. त्यावरून देवेंद्र फडणवीस यांची बदनामी केल्याप्रकरणी रतन खालकर, संकेत भोसले, प्रमोद कोहकंडे, राहुल जोशी आणि बंटी ठाकरे या पाचजणांविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

Web Title: A case has been registered against those who defamed Fadnavis