पैशांवरून मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2020 00:57 IST2020-01-12T23:31:18+5:302020-01-13T00:57:49+5:30

एका व्यक्तीला व्यवसायासाठी दिलेले पैसे पुन्हा मागितले असता त्याचा राग आल्याने मामेभाऊ व त्याच्या दोन मित्रांनी घरी येऊन दांमत्यास मारहाण करून घरातील सामानाची मोडतोड केली. तसेच गळ्यातील सोन्याची चैन ओढून पळून गेल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

Case filed for money laundering | पैशांवरून मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल

पैशांवरून मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल

नाशिकरोड : एका व्यक्तीला व्यवसायासाठी दिलेले पैसे पुन्हा मागितले असता त्याचा राग आल्याने मामेभाऊ व त्याच्या दोन मित्रांनी घरी येऊन दांमत्यास मारहाण करून घरातील सामानाची मोडतोड केली. तसेच गळ्यातील सोन्याची चैन ओढून पळून गेल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
जयभवानीरोड रामस्नेह अपार्टमेंटमध्ये राहणारे राजेंद्रसिंग मुक्तारसिंग घारा यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मी व मामेभाऊ गुरूमितसिंग ऊर्फ सिट्टु रिपीयाल रा. त्रिलोक व्हिला, लोणकर मळा, जयभवानीरोड येथे उभे असताना यावेळी गुरूमितसिंग याचे मित्र नवज्योतसिंग रंधवा व गायकवाड तेथे आले. लांबा यास व्यवसायासाठी ४ लाख रुपये दिले होते. ते पैसे गुरूमितसिंग याच्याकडे मागितले असता त्याने शिवीगाळ करून दमदाटी केली. शुक्रवारी रात्री १ वाजेच्या सुमारास पैसे मागितल्याचा राग मनात धरून गुरूमितसिंग रिपीयाल, नवज्योतसिंग रंधवा, साजन घरी आले. पत्नीला धक्काबुक्की करून मारहाण केली. तसेच फिर्यादी राजेंद्रसिंग घारा याला मारहाण करून गळ्यातील सोनसाखळी ओढून तोडून घेतली. तसेच घरातील सामानाचे नुकसान केले.

Web Title: Case filed for money laundering

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.