देवळाली येथे मारहाण प्रकरणी गुन्हे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2019 01:19 IST2019-12-03T01:18:52+5:302019-12-03T01:19:20+5:30

देवळालीगाव सुंदरनगर येथे बेदम मारहाण करून जखमी केल्याप्रकरणी परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

 Case filed against Deolali | देवळाली येथे मारहाण प्रकरणी गुन्हे दाखल

देवळाली येथे मारहाण प्रकरणी गुन्हे दाखल

नाशिकरोड : देवळालीगाव सुंदरनगर येथे बेदम मारहाण करून जखमी केल्याप्रकरणी परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
जयभवानीरोड फर्नांडिसवाडी येथील शुभम हरबीर बहेनवाल (१९) याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, गुरुवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास देवळालीगाव सुंदरनगर येथे कामानिमित्त गेलो होतो. यावेळी लक्ष्मण बापू कुमावत (२३) रा. गोरेवाडी व त्याचे दोन अनोळखी साथीदार यांनी काहीएक कारण नसताना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली व धारदार हत्याराने दोन्ही हातांवर, मानेवर वार करून जखमी केले.
गोरेवाडी शास्त्रीनगर येथील लक्ष्मण बापू कुमावत याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, गुरुवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास भावाला शोधण्यासाठी देवळालीगाव सुंदरनगर येथे गेलो होतो. यावेळी शुभम ऊर्फ बाशी हरबीर बहेनवाल, जय ऊर्फ मारुती वाल्मीक घोरपडे (रा. सुंदरनगर देवळालीगाव) यांनी लक्ष्मण याला किरकोळ कारणावरून शिवीगाळ करून मारहाण केली व कोयत्याने लक्ष्मणच्या डोक्यात व हातावर वार करून जखमी केले. या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल केले
आहेत.
युवकास मारहाण
आगरटाकळी वैदूवाडी येथील अंबरिश अशोक लोखंडे याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, सुगंध निर्मळ रा. समतानगर आगरटाकळी व त्याच्या एका मित्राने अंबरिश यास वडिलांना शिवीगाळ का केली या कारणावरून कुरापत काढून शिवीगाळ करून मारहाण केली. सुगंध निर्मळ याने लोखंडी रॉडने अंबरिशच्या डोक्यात, डाव्या खांद्यावर गंभीर दुखापत करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.

Web Title:  Case filed against Deolali